T20 WC : भारतानं पुन्हा पाकिस्तानला डिवचलं; ‘मौका-मौका’चा नवा VIDEO घालतोय धूमाकुळ!

स्टार स्पोर्ट्सच्या ट्विटर हँडलवरून हा VIDEO शेअर करण्यात आला आहे.

t20 world cup mauka mauka ad new video released before india pakistan clash
मौका-मौकाचा नवा व्हिडिओ व्हायरल

टी-२० विश्वचषकाचा सुपर-१२ टप्पा सुरू झाला आहे. आता क्रिकेट चाहते उद्याच्या दिवसाची वाट पाहत आहेत. कारण भारत उदया पाकिस्तानशी भिडणार आहे. या सामन्यासाठी काही क्रीडाप्रेमी विशेष तयारी करून बसले आहेत. दरम्यान, मौका-मौका या प्रसिदध जाहिरातीचा एक नवीन व्हिडिओ देखील शेअर करण्यात आला आहे. यामध्ये ‘झिरो’ चा उल्लेख करताना पाकिस्तानला टोपणा लगावण्यात आला आहे.

स्टार स्पोर्ट्सच्या ट्विटर हँडलवरून शनिवारी मौका-मौका जाहिरातीचा एक नवा व्हिडिओ शेअर करण्यात आला. यामध्ये एक मुलगा मोहसीन दुबईतील शाळेत शिकत असल्याचे दाखवले आहे. दरम्यान, लायब्ररीतली एक मुलगी म्हणते, हा झिरो करणारा कोणता हिरो असेल. तेव्हाच मोहसीनचा मित्र त्याला सांगतो, ते तुझ्या वडिलांबद्दल बोलत आहेत.

हेही वाचा – T20 WC : पाकिस्तानला सामोरं जाण्यापूर्वी विराट-रोहित झाले आक्रमक; पाहा VIDEO

नंतर, मोहसीनचे वडील तोच अभिनेता असतो, जो मौका-मौका जाहिरातीत पाकिस्तानला पाठिंबा देताना दिसतो. ‘शून्याचा शोध भारताने नक्कीच लावला, पण प्रत्येक प्रसंगी त्याचा वापर करणारा तर..’, असे कॅप्शन व्हिडिओला देण्यात आले आहे. खरे तर, पाकिस्तान संघाला या व्हिडिओद्वारे डिवचण्यात आले आहे. कारण हा कट्टर प्रतिस्पर्धी वर्ल्डकपमध्ये भारताला कधीही पराभूत करू शकलेला नाही.

या हाय व्होल्टेज सामन्यासाठी पाकिस्तानने १२ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. संघाची कमान बाबर आझमच्या हाती आहे. अनुभवी शोएब मलिक आणि मोहम्मद हाफिज यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: T20 world cup mauka mauka ad new video released before india pakistan clash adn

Next Story
हॉकीबाबतचा फैसला ३ नोव्हेंबरला
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी