काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या टी-२० वर्ल्डकपसाठी भारताने आपल्या नवीन जर्सीचे अनावरण केले. बीसीसीआयने आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक फोटो शेअर करून याबाबत माहिती दिली. या फोटोसह, बीसीसीआयने लिहिले, “बिलियन चीयर्स जर्सी सादर करत आहे. जर्सीचा नमुना टीम इंडियाच्या चाहत्यांनी प्रेरित केला आहे. या जर्सीचा रंग गडद निळा आहे.”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह यांचा जर्सीसोबतचा फोटो ट्विटरवर शेअर करत बीसीसीआयने लिहिले, “जर्सीचा नमुना चाहत्यांच्या कोट्यवधी प्रोत्साहनाने प्रेरित आहे.” भारताने आयोजित केलेला हा टी-२० विश्वचषक १७ ऑक्टोबरपासून संयुक्त अरब अमिराती आणि ओमानमध्ये खेळला जाईल.

रोहितची ‘ती’ कृती कौतुकास्पद

भारतीय खेळाडूंचा नव्या जर्सीसोबतचा फोटो व्हायरल होताच, त्यात असलेला रोहित शर्मा जास्त चर्चेत आला आहे. त्याची एक कृती कौतुकास्पद ठरली आहे. फोटोंमधील विराट, जडेजास बुमराहने आपले बोट बीसीसीआयच्या लोगोकडे तर रोहितने आपले बोट INDIA या शब्दाकडे दाखवले. टीम इंडिया टी-२० वर्ल्डकपमध्ये आपल्या मोहिमेची सुरुवात २४ ऑक्टोबर रोजी दुबईत पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्याने करणार आहे. यानंतर, भारताचा सामना ३१ ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडशी होईल. त्याच वेळी, ३ नोव्हेंबर रोजी, अबुधाबीमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध त्याचा तिसरा सामना असेल.

हेही वाचा – T20 World Cup : टीम इंडियाचा ‘मेंटॉर’ बनलेल्या धोनीनं किती मानधन घेतलं?; BCCIचे जय शाह म्हणाले…

टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी.

राखीव खेळाडू: श्रेयस अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर.

मार्गदर्शक: महेंद्रसिंह धोनी

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T20 world cup rohit sharmas this action with team indias new jersey is admirable adn
First published on: 13-10-2021 at 15:36 IST