Gambhir asked Kaif if the name is more important than the form of the player: टीम इंडियाचा माजी क्रिकेटर मोहम्मद कैफ आणि गौतम गंभीर यांच्यात इशान किशन आणि केएल राहुल यांच्यात जोरदार वाद झाला. आशिया चषकात पाकिस्तानविरुद्ध पाचव्या क्रमांकावर असलेल्या इशान किशनच्या ८२ धावांच्या शानदार खेळीनंतर या दोन माजी क्रिकेटपटूंमध्ये हा वाद झाला. मोहम्मद कैफ म्हणाला की केएल राहुलच्या पुनरागमनानंतर इशान किशनला बाहेर बसावे लागेल. यावर गौतम गंभीर म्हणाला की वर्ल्ड कप जिंकण्यासाठी फॉर्म किंवा नाव महत्त्वाचे आहे का?
किशनला पुढच्या संधीची वाट पाहावी लागेल –
स्टार स्पोर्टवर बोलताना मोहम्मद कैफ म्हणाला, “केएल राहुल सामना विजेता आहे. पाचव्या क्रमांकावर असलेले त्याचे आकडे विलक्षण आहेत, हे राहुल द्रविडला माहीत आहे. याबाबत तो स्पष्ट आहे. मोहम्मद शमीला आज संधी देण्यात आली नाही हे लक्षात ठेवा. त्यामुळे, केएल राहुल पुन्हा फिट झाल्यावर तो प्लेइंग इलेव्हनमध्ये असेल आणि इशान किशनला त्याच्या पुढच्या संधीची वाट पाहावी लागेल.”
इशान किशन केएल राहुलची जागा नाही घेऊ शकत –
मोहम्मद कैफ पुढे म्हणाला, “इशान त्याच्यासाठी आवश्यक ते सर्व करत आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतही त्याने धावा केल्या होत्या. त्याचा आलेख दिवसेंदिवस उंचावत चालला आहे. त्याच्या नावावर द्विशतकही आहे. त्याच्याकडे क्लास आणि प्रतिभा आहे, पण तो सध्या राहुलची जागा घेऊ शकत नाही. कारण राहुल खराब फॉर्ममुळे नव्हे, तर दुखापतीमुळे खेळत नाही.”
विश्वचषक जिंकण्यासाठी नाव महत्वाचे आहे की फॉर्म?
मोहम्मद कैफचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर गौतम गंभीरने लगेच त्याला एक प्रश्न विचारला. गौतम गंभीर विचारले की, विश्वचषक जिंकण्यासाठी नाव महत्वाचे आहे की फॉर्म? तो म्हणाला, “जर कोहली किंवा रोहितने सलग चार अर्धशतके झळकावली असती, तर तुम्ही केएल राहुलबद्दल असेच म्हटले असते का? जेव्हा तुम्ही विश्वचषक जिंकण्याच्या तयारीत असता, तेव्हा तुम्ही नाव बघत नाही तर त्या खेळाडूचा फॉर्म बघता, जो तुम्हाला ट्रॉफी जिंकवून देऊ शकतो.”