बंगळूरु : जॉर्डन हरमान (७१) आणि जुबैर हमजा (६६) यांच्या शतकी भागीदारीनंतर तनुष कोटियनच्या नेतृत्वाखाली भारतीय ‘अ’ संघाच्या फिरकीपटूंनी केलेल्या प्रभावी कामगिरीमुळे दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाला चार दिवसांच्या अनौपचारिक कसोटी सामन्यात पहिल्या दिवसअखेर ९ बाद २९९ धावसंख्येपर्यंत मजल मारता आली.
प्रथम फलंदाजीस उतरलेल्या दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघासाठी हरमान आणि हमजा यांनी दुसऱ्या गड्याकरिता १३२ धावांची निर्णायक भागीदारी रचली. हमजाला वेगवान गोलंदाज गुरनूर बरारने बाद केले. यानंतर भारतीय गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी केली. हरमानला ऑफ स्पिनर कोटियनने पायचीत केले. कोटियनने (४/८३) आपल्या फिरकीपटू प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना अडचणीत आणले.
सलामीवीर लेसेगो सेनोकवानेला वेगवान गोलंदाज अंशुल कम्बोजने पहिल्या ‘स्लिप’मध्ये आयुष म्हात्रे करवी झेलबाद केले. रिवाल्डो मूनसॅमीला मानव सुथारने बाद केले. कर्णधार मार्कस एकरमनने कोटियनच्या गोलंदाजीवर सुथारला झेल दिला. दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाने आपले तीन गडी २७ धावांवर गमावले. हरमान व हमजा जोपर्यंत खेळपट्टीवर होते, तोवर त्यांनी भारतीय गोलंदाजांना दबावाखाली ठेवले. जुलैमध्ये इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटीत जायबंदी झाल्यानंतर पंतचा हा पहिला सामना होता.
