विजय हजारे करंडक स्पर्धेत कर्नाटकने बाजी मारल्यानंतर बीसीसीआयने देवधर चषक स्पर्धेसाठी भारत ‘अ’ आणि ‘ब’ संघाची घोषणा केली आहे. मुंबई आणि महाराष्ट्राच्या खेळाडूंना दोन्ही संघांमध्ये स्थान देण्यात आलेलं असून भारत ब संघाचं नेतृत्व मुंबईकर श्रेयस अय्यरकडे देण्यात आलं आहे. तर गेल्या काही महिन्यांमध्ये वन-डे क्रिकेटपासून दुरावलेल्या रविचंद्रन आश्विनला भारत अ संघाचं नेतृत्व देण्यात आलं आहे.

४-८ मार्चदरम्यान धर्मशाळा येथे देवधर चषकाचे सामने रंगणार आहेत. याचसोबत १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या पृथ्वी शॉ, शुभमन गिल यासारख्या खेळाडूंनाही संघात जागा देण्यात आली आहे.

भारत ‘अ’ संघ – रविचंद्रन आश्विन (कर्णधार), पृथ्वी शॉ, उन्मुक्त चंद, अक्षदीप नाथ, शुभमन गिल, रिकी भुई, सुर्यकुमार यादव, इशान किशन (यष्टीरक्षक), कृणाल पांड्या, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, बसील थम्पी, कुलवंत खेजरोलीया, रोहीत रायडू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारत ‘ब’ संघ – श्रेयस अय्यर (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, अभिमन्यू इश्वरन, अंकित बावने, मनोज तिवारी, सिद्धेश लाड, कोना भारत (यष्टीरक्षक), जयंत यादव, धर्मेंद्र जाडेजा, हनुमा विहारी, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, हर्षल पटेल, उमेश यादव, रजत पाटीदार