Team India Former Coach Ravi Shastri Big Statement : भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी पंजाब किंग्जचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. सटीक यॉर्कर टाकून भल्या भल्या फलंदाजांच्या दांड्या गुल करणारा अर्शदीप टीम इंडियासाठी तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळू शकतो, असा विश्वास शास्त्री यांनी व्यक्त केला आहे. अर्शदीप सिंगने मुंबई इंडियन्सविरोधात झालेल्या सामन्यात शेवटच्या षटकात सटीक यॉर्कर फेकून दोन फलंदाजांचा त्रिफळा उडवला होता. विशेष म्हणजे वेगवान चेंडूत दोनवेळा स्टंप मोडण्याचा पराक्रम अर्शदीपने केला होता. त्यामुळे अर्शदीप सिंगची क्रीडाविश्वात तुफान चर्चा रंगली आहे.

युवा गोलंदाज अर्शदीपने माजी कोच रवी शास्त्रींनाही प्रभावित केलं आहे. शास्त्री यांनी ईएसपीएन क्रिकइन्फोवर संवाद साधताना अर्शदीपबाबत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “अर्शदीपला खूप पुढे जाताना पाहायचं आहे. तो भारतासाठी तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळू शकतो, असं मला वाटतं. मी त्याला रेड बॉल क्रिकेटमध्ये खेळताना पाहायला नाहीय. परंतु, ज्या पद्धतीने अर्शदीप गोलंदाजीत सुधारणा करत आहे, त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढत आहे. मागील वर्षी त्याने खूप चांगली कामगिरी केली होती. आताही तो खूप चांगलं प्रदर्शन करत आहे.”

नक्की वाचा – ‘पृथ्वी शॉ’चं आयपीएल करिअर संपलं? पुनरागमनाबाबत रिकी पॉंटिंगने दिली मोठी प्रतिक्रिया, म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंजाब किंग्जसाठी चमकदार कामगिरी केल्यामुळं अर्शदीप सिंगची तुफान चर्चा रंगली होती. अर्शदीपला याच कामगिरीच्या आधारावर भारतासाठी पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. त्याने भारतासाठी एशिया कप, टी-२० वर्ल्ड कप २०२२ आणि घरेलू मालिकांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. यंदाच्या आयपीएल हंगामातही अर्शदीप पंजाबसाठी भेदक गोलंदाजी करत आहे. त्याने ८ सामन्यात १४ विकेट्स घेत परपल कॅपच्या स्पर्धेत तिसऱ्या स्थानावर नोंद केली आहे.