Rahul Dravid and Aditi Dravid : विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने भारतीय संघाचा पराभव केला. सहा गडी राखून ऑस्ट्रेलियाने विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. या पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड चर्चेत आहेत. क्रिकेटर आणि भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांची पुतणी आदितीने काका तू ग्रेट कोच आहेस असं म्हटलं आहे. तसंच रविवारी जो भारतीय संघाचा पराभव झाला तो आपल्या आयुष्यातला मोठा हार्टब्रेक असल्याचं ही आदितीने म्हटलं आहे. Latest Marathi news

काय म्हटलं आहे आदिती द्रविडने?

“राहुल द्रविड माझे काका आहेत. माझे वडील गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून क्रिकेट विश्वात काम करत आहेत. ते रणजी ट्रॉफी प्लेअर आहेत. वडिलांच्या क्रिकेटमुळेच मला काका राहुल द्रविड यांचं क्रिकेटही खूप आवडतं. तसंच राहुल द्रविड आणि माझं नातं खूपच घट्ट होत गेलं. हेड कोच म्हणून त्यांची टर्म संपते आहे. हा विश्वचषक त्यांचा शेवटचा विश्वचषक होता. राहुल काका प्रचंड मेहनती असून खूप कष्ट घेतो. मला वाटतं राहुल द्रविड हा सर्वोत्कृष्ट कोच आहे.”

अंतिम सामन्याविषयी काय म्हणाली आदिती द्रविड?

भारत ऑस्ट्रेलिया सामन्याबद्दल बोलताना आदिती म्हणाली, “नाणेफेकीपासून गणित बिघडायला लागलं. विश्वचषकाचा हा सामना खूप महत्त्वाचा होता. टीम इंडिया खूप प्रयत्न करत होती. २४० पण होतील की नाही अशी शंका होती. सर्वच भारतीय टीम इंडियाला सपोर्ट करत होती. शेवटपर्यंत काहीतरी जादू व्हावी असं वाटत होती. याआधीचे सगळे सामने आपण खूप चांगल्या पद्धतीने खेळलो आणि चिंगलो होतो. ऑस्ट्रेलिया टीमने खूप कमालीचा खेळ रविवारी केला.” असं आदितीने म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“भारताचा पराभव झाल्यानंतर सर्व खेळाडूंना अश्रू अनावर झाले होते. क्रिकेटप्रेमींना ते चित्र पाहावत नव्हतं. पण आता वर्ल्डकप चार वर्षांनी येणार आहे. त्यावेळची टीम अख्खी वेगळी असू शकते. काल सर्व भारतीयांना आपलाच वर्ल्डकप आहे, असं शेवटपर्यंत वाटत होतं. माझं आतापर्यंतचं हे हर्ट झालेलं हार्टब्रेक आहे. नाटकाच्या प्रयोगाप्रमाणे खेळदेखील एक प्रयोगच आहे.” एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत आदितीने हे वक्तव्य केलं.