संपूर्ण जगभरात करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे भीतीचे वातावरण आहे. डॉक्टर आणि सहकारी अथक परिश्रम करून काहींना करोनातून पूर्णपणे बरे करण्यात यशस्वी झाले आहेत. पण तरीदेखील लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. उपाययोजनांचा भाग म्हणून बहुतांश देशांनी लॉकडाउनचा पर्याय स्वीकारला आहे. त्यामुळे क्रीडा स्पर्धादेखील बंद आहेत. IPL चे आयोजन लांबणीवर ढकलण्यात आले आहे. अशा परिस्थितीत क्रिकेटपटूंपासून ते समालोचकांपर्यंत सारेच आपल्या चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी लाईव्ह चॅटचे माध्यम वापरत आहेत.

“धोनी स्टार झाला आणि माझ्या कामगिरीचा आलेख घसरला, पण मैत्री कायम”

माजी क्रिकेटपटू आणि लोकप्रिय समालोचक आकाश चोप्रा यांनी माजी वेगवान गोलंदाज रूद्र प्रताप सिंग याच्याशी लाइव्ह चॅटमार्फत संवाद साधला. या चॅटमध्ये त्या दोघांनी अनेक हलक्या-फुलक्या विषयांवर गप्पा मारल्या. त्यानंतर काही गंभीर आणि जुन्या विषयांवरही चर्चा झाली. या दरम्यान रूद्र प्रताप सिंग याने तत्कालीन निवड समितीवर एक खळबळजनक आरोप केला.

विराट की तेंडुलकर? युवराज की धोनी?… लाईव्ह चॅटवर रंगला ‘रॅपिड फायर’चा खेळ

“मी कारकिर्दीची अतिशय चांगली सुरूवात केली होती. माझी कामगिरीदेखील चांगली होत होती, पण मी कसोटी आणि एकदिवसीय संघात फार काळ माझी जागा टिकवून ठेवू शकलो नाही. मी IPL खेळलो, तेव्ही मी ३-४ हंगामात सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज ठरलो होतो. पण मला फार काळ संघात राहता आलं नाही. कदाचित कर्णधाराला माझ्यावर विश्वास नव्हता किंवा माझी कामगिरी ढासळली असावी. मी निवडकर्त्यांनादेखील मला संघातून वगळण्याबाबत विचारलं, पण त्यांनी मला त्याबद्दल काहीह उत्तर दिलं नाही. याउलट त्यांनी फक्त ‘आणखी कठोर परिश्रम कर. तुझी वेळ नक्की येईल’ असं सांगून माझी अक्षरश: बोळवण केली”, असा आरोप निवडकर्त्यांवर केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आर पी सिंग

“आयुष्यात एकदाच कॉफी प्यायलो, ‘स्टारबक्स’पेक्षाही महाग पडली”

या चॅटमध्ये त्याने माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी याच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. “आम्ही सुरूवातीच्या काळात अनेक वेळा एकत्र वेळ घालवायचो आणि खूप गप्पा मारायचो. त्यानंतर त्याला कर्णधारपद मिळाले आणि त्याची कामगिरी उंचावत गेली. मी मात्र माझ्या कामगिरीत सातत्य राखू शकलो नाही. पण आमची मैत्री मात्र अजूनही अगदी तशीच घट्ट आहे. आम्ही अजूनही एकत्र असलो की गप्पा मारतो आणि मनसोक्त भटकतो. फक्त क्रिकेटबाबत आमची मत काहीशी वेगळी आहेत”, असे आर पी सिंगने सांगितले.