Team India Semi Final Scenario After NZ vs BAN Match: आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या सामन्यात बांगलादेश आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात न्युझीलंडने बांगलादेशवर दमदार विजयाची नोंद केली. न्यूझीलंडला गेल्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. आता बांगलादेशवर १०० धावांनी विजय मिळवून न्यूझीलंडने गुणतालिकेत खातं उघडलं आहे.
न्यूझीलंडच्या विजयानंतर भारतीय संघाचं टेन्शन वाढलं आहे. भारतीय संघाला गेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवामुळे भारतीय संघाचं सेमीफायनलमध्ये जाण्याचं गणित बिघडलं आहे. भारतीय संघाचा पुढील सामना गतविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. भारतीय संघाचे पुढील सामना ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि इंग्लंड सारख्या बलाढ्य संघांविरुद्ध होणार आहे. प्रत्येक सामना हा भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे.
भारतीय संघाचा पुढील सामना रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. त्यानंतर १९ ऑक्टोबरला इंग्लंडविरुद्ध आणि २३ ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. तिन्ही बलाढ्य संघ आहेत. न्यूझीलंडने ज्या पद्धतीने पुनरागमन केलं आहे, त्यावरून भारतीय संघासाठी आव्हान कठीण असणार आहे.
भारतीय संघाने आतापर्यंत ३ पैकी २ सामने जिंकले आहेत. ४ गुणांसह भारतीय संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. तर ५ गुणांसह ऑस्ट्रेलियाचा संघ अव्वल स्थानी आणि ४ गुणांसह इंग्लंडचा संघ दुसऱ्या स्थानी आहे.
भारतीय संघासाठी कसं आहे समीकरण?
भारतीय संघाला जर सेमीफायनलमध्ये प्रवेश करायचा असेल, तर पुढील ४ पैकी ३ सामन्यांमध्ये विजय मिळवावा लागणार आहे. या ४ पैकी एक सामना बांगलादेशविरुद्ध होणार आहे. या सामन्यात भारतीय संघ विजय मिळवू शकतो. पण उर्वरित ३ सामने भारतीय संघासाठी कठीण असणार आहेत. भारतीय संघाला सेमी फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी ४ पैकी ३ सामने जिंकावे लागणार आहेत. त्यामुळे भारतीय संघासाठी येणारे सर्व सामने अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. आता हे आव्हान पार करून भारतीय संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.