टेनिसपटू रॉजर फेडररच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. गोल्फपटू टायगर वुड्सला मागे टाकत रॉजर फेडरर वैयक्तिक क्री़डा प्रकारात सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू ठरला. फोर्ब्स मासिकाने दिलेल्या अहवालानुसार, रॉजर फेडररने आतापर्यंत बक्षिसांच्या माध्यमातून ११ कोटी २ लाख ३५ हजार ६८२ अमेरिकी डॉलर्सची कमाई केली. फेडररने टायगर वुड्सच्या ११ कोटी ६१ हजार अमेरिकी डॉलर्स या कमाईला मागे टाकत, सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू हा मान मिळवला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या वर्षात दुखापतींमुळे ग्रासलेल्या फेडररला मैदानात आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नव्हती. मात्र यंदाच्या वर्षात रॉजर फेडररने दणक्यात पुनरागमन करत आपल्याला टेनिसचा अनभिषिक्त सम्राट का म्हणतात हे दाखवून दिलं. यंदा फेडररच्या खात्यात ऑस्ट्रेलिया आणि विम्बल्डन या दोन ग्रँडस्लॅम स्पर्धांची विजेतेपदं जमा आहेत. याव्यतिरिक्त अन्य स्पर्धांच्या अंतिम फेरीतही फेडररने बाजी मारली आहे. या कामगिरीमुळे रॉजर फेडरर जागतिक क्रमवारीत दुसरं स्थान मिळवलं.

२०१७ हे वर्ष रॉजर फेडररच्या कारकिर्दीसाठी अत्यंत सकारात्मक गेलं आहे. २००९ सालापासून फेडररने सर्वाधिक ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. तर २००७ साली फेडररने सर्वाधिक स्पर्धांची विजेतेपदं पटकावण्याची किमया साधली. वर्षाच्या सुरुवातीस जागतिक क्रमवारीत १२ व्या क्रमांकावर फेकल्या गेलेल्या रॉजर फेडररने आपल्या खेळात सुधारणा करुन आता क्रमवारीत दुसरं स्थान पटकावलं आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tennis star roger federer overtakes tiger woods to become no 1 price money earner
First published on: 16-11-2017 at 14:35 IST