मुंबई महापौर चषक किशोर-किशोरी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पध्रेत किशोर गटात पालघर, ठाणे, पुणे, तर किशोरी गटात पुणे, ठाणे यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. 
किशोरांच्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात नाशिकने यजमान मुंबई उपनगरवर २०-१४ असा ़विजय नोंदवला. पालघरने रत्नागिरीवर १२-१० असा विजय मिळवला. पालघरच्या चिन्मय तामोरे (२ मि़) व प्रतीक भुतकडे (५ बळी) यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. गतविजेत्या ठाणे संघाने सातारा संघाला  १३-७ असे एक डाव व सहा गुणांनी हरवले. ठाण्याचे आकाश कदम (४.४० मि़  व ४ बळी), शार्दूल मेहतर (३.२० मि़ ), शुभम जोशी (२ मि़  व ३ बळी) व प्रज्वल पाटील (३ बळी) हे विजयाचे प्रमुख शिल्पकार होते. 
किशोरी गटात पुण्याच्या संघाने मुंबईचे आव्हान ६-५  असे एक गुण व ४.४० मि़  राखून परतावून लावत उपांत्यपूर्व फेरी गाठली. ठाण्याच्या मुलींनी औरंगाबादविरुद्ध १०-७ अशी एक डाव व ३ गुणांनी बाजी मारली.
  संग्रहित लेख, दिनांक 15th Mar 2015 रोजी प्रकाशित  
 ठाणे, पुणे, पालघर उपांत्यपूर्व फेरीत
मुंबई महापौर चषक किशोर-किशोरी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पध्रेत किशोर गटात पालघर, ठाणे, पुणे, तर किशोरी गटात पुणे, ठाणे यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
  First published on:  15-03-2015 at 05:50 IST  
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा.  मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News)  वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane pune palghar mayor cup kho kho