ऑस्ट्रेलियाचा स्टार फिरकीपटू नॅथन लायनने कसोटी क्रिकेटमध्ये ४०० बळी पूर्ण केले आहेत. ऑफस्पिनर लायनने २०२१-२२च्या अ‍ॅशेस मालिकेत ही कामगिरी केली. लायनने इंग्लंडच्या डेव्हिड मलानला आपला ४०० वा बळी बनवले. अशी कामगिरी करणारा लायन हा जगातील सातवा फिरकी गोलंदाज आहे. आतापर्यंत १७ गोलंदाजांनी ४०० कसोटी बळी घेतले आहेत. ४०० बळींचा प्रवास पूर्ण करणारा लायन हा तिसरा ऑस्ट्रेलियन गोलंदाज आहे.

३४ वर्षीय लायन हा ४०० कसोटी विकेट घेणारा पहिला बिगर आशियाई ऑफस्पिनर आहे. आतापर्यंत एकूण ७ फिरकीपटूंनी ४०० किंवा त्याहून अधिक कसोटी बळी घेतले आहेत. यातील ३ फिरकीपटू भारताचे आहेत. भारताचा लेगस्पिनर अनिल कुंबळे आणि ऑफस्पिनर रवीचंद्रन अश्विन आणि हरभजन सिंग यांनी ही कामगिरी केली आहे. कुंबळेने ६०० पेक्षा जास्त कसोटी विकेट घेतल्या आहेत. तथापि, स्ट्राइक रेटचा विचार केल्यास, लायनने कुंबळे आणि हरभजन सिंग यांना मागे टाकले आहे.

हेही वाचा – ‘‘आमच्या खेळाडूंना अहंकार…”, टीम इंडियाची साथ सोडलेल्या प्रशिक्षकानं केले ड्रेसिंग रुममधील खुलासे!

४०० हून अधिक बळी घेतलेल्या १७ गोलंदाजांमध्ये डेल स्टेनचा (४२.३) सर्वोत्तम स्ट्राइक रेट आहे. दक्षिण आफ्रिकेच्या स्टेनने जवळपास प्रत्येक ४२व्या चेंडूवर विकेट घेतल्या. तो एकमेव गोलंदाज आहे ज्याचा स्ट्राईक रेट ५० पेक्षा कमी आहे. या यादीत न्यूझीलंडचे रिचर्ड हॅडली (५०.८) दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

ऑस्ट्रेलियानं जिंकला सामना

ब्रिस्बेनच्या गाबा येथे रंगलेल्या अ‍ॅशेसच्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियानं इंग्लंडला ९ गड्यांनी हरवत पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. इंग्लंडला ऑस्ट्रेलियासमोर केवळ २० धावांचे आव्हान ठेवता आले. ऑस्ट्रेलियाने ५.१ षटकात हे आव्हान एक गडी गमावून गाठले. इंग्लंडचा दुसरा डाव २९७ धावांवर आटोपला. इंग्लंडने पहिल्या डावातील २७८ धावांच्या पिछाडीमुळे ऑस्ट्रेलियाला केवळ २० धावांचे लक्ष्य दिले होते. ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात लायनने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तत्पूर्वी इंग्लंडचा पहिला डाव १४७ धावांत आटोपला होता, तर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४२५ धावा करत २७८ धावांची आघाडी घेतली. पहिल्या डावात दीडशतकी खेळी केलेल्या ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडला सामनावीर पुरस्कार मिळाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारे ऑफ स्पिनर

  • ८०० – मुथय्या मुरलीधरन (१३३ सामने)
  • ४२७ – रवीचंद्रन अश्विन (८१ सामने)
  • ४१७ – हरभजन सिंग (१०३ सामने)
  • ४०३ – नॅथन लायन (१०१ सामने)
  • ३०९ – लान्स गिब्स (७९ सामने)