Pakistan Cricket team Bad Fielding video viral : पाकिस्तान क्रिकेट संघ नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. हा संघ सर्वात जास्त आपल्या खराब क्षेत्ररक्षणामुळे चर्चेत राहतो. शान मसूदच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघ कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तान संघाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जिथे पाकिस्तानच्या खेळाडूंनी खराब क्षेत्ररक्षणामुळे एका चेंडूवर विरोधी संघाला सात धावा दिल्या आहेत.

पाकिस्तान संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. पण त्याआधी, मसूदच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघ पंतप्रधान इलेव्हन विरुद्ध चार दिवसांचा सराव सामना खेळत आहे, ज्याचे तीन दिवस पूर्ण झाले आहेत. या सामन्यादरम्यान पाकिस्तानी क्षेत्ररक्षकांनी क्षेत्ररक्षणात मोठी चूक केली, त्यामुळे एका चेंडूवर ७ धावा गमावल्या. या खराब क्षेत्ररक्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाकिस्तान संघाच्या खराब क्षेत्ररक्षणाचा व्हिडीओ व्हायरल –

व्हिडीओमध्ये पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज अबरार अहमद चेंडू टाकत असल्याचे दिसून येते, जो ऑस्ट्रेलियन फलंदाज मॅथ्यू रेनशॉ लाँग ऑफच्या दिशेने मारतो आणि तीन धावा घेत आपले अर्धशतक पूर्ण करतो, तोपर्यंत पाक क्षेत्ररक्षक चेंडूला सीमारेषेपूर्वी अडवतो आणि गोलंदाजांकडे फेकतो. पण यानंतर, बॉलिंग एंडला चेंडू पकडल्यानंतर बाबर आझमने हा चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने फेकतो. त्यानंतर हा चेंडू तिथून थेट सीमारेषेच्या बाहेर जातो. अशा प्रकारे पाकिस्तानला एका चेंडूवर ७ धावा गमवाव्या लागल्या.

हेही वाचा – MS Dhoni : “जर २० किलो वजन कमी केले, तर मी आयपीएलमध्ये…”, अफगाणिस्तानच्या खेळाडूचा माहीबद्दल मोठा खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तिसऱ्या दिवसअखेर पंतप्रधान इलेव्हन २४ धावांनी पिछाडीवर –

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने ३९१ धावा करून डाव घोषित केला. त्यानंतर पंतप्रधान इलेव्हनने डावाला सुरुवात केली. या संघाने तिसऱ्या दिवसअखेर ४ गडी गमावून ३६७ धावा केल्या होत्या. अशा प्रकारे पंतप्रधान इलेव्हन २४ धावांनी पिछाडीवर आहे. ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू रेनशॉ १३६ धावांवर खेळत आहे. त्याच्यासोबत ब्यू वेबस्टर २१ धावांवर नाबाद आहे.