WPL 2023 1st Match MIW vs GGW: महिला प्रीमियर लीगची (WPL) ऐतिहासिक सुरुवात झाली आहे. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर शनिवारी महिला प्रीमियर लीगचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन आणि कियारा अडवाणी यांनी परफॉर्म केले. कियाराने ‘बिजली’ गाण्यावर परफॉर्म केले. पंजाबी पॉप स्टार एपी धिल्लनने त्याच्या सुपरहिट गाण्याव्यतिरिक्त डब्ल्यूपीएल गाणे गायले.

गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सलामीच्या सामन्याला आठला सुरुवात झाली. या अगोदर महिला प्रीमियर लीग २०२३ च्या ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले.

पाचही महिला कर्णधारांच्या हस्ते ट्रॉफीचे अनावरण –

महिला प्रीमियर लीग २०२३ च्या ट्रॉफीचे अनावरण पाच कर्णधारांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये मेग लॅनिंग (दिल्ली कॅपिटल्स), बेथ मुनी (गुजरात जायंट्स), हरमनप्रीत कौर (मुंबई इंडियन्स), स्मृती मंधाना (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) आणि अॅलिसा हिली (यूपी वॉरियर्स) या पाच कर्णधारांचा समावेश होता.

गुजरात जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): बेथ मुनी (कर्णधार), सब्भिनेनी मेघना, हरलीन देओल, अॅशलेग गार्डनर, अॅनाबेल सदरलँड, दयालन हेमलता, जॉर्जिया वेरेहम, स्नेह राणा, तनुजा कंवर, मोनिका पटेल, मानसी जोशी

मुंबई इंडियन्स महिला (प्लेइंग इलेव्हन): हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षख), हरमनप्रीत कौर (कर्णधार), नॅट सायव्हर-ब्रंट, अमेलिया केर, अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, हुमैरा काझी, इस्सी वोंग, जिंतीमणी कलिता, सायका इशाक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खेळपट्टीवर फलंदाज आणि गोलंदाजांना मदत मिळेल –

डी.वाय.पाटीलच्या खेळपट्टीबद्दल बोलायचे तर, येथे डावीकडे सीमा रेषा ४८ मीटर आहे, तर दुसरीकडे ६६ मीटर आहे. गोलंदाजांनी हे लक्षात ठेवले पाहिजे. या सामन्यात दव मोठी भूमिका बजावेल परंतु खेळपट्टीवर हिरवा पॅच आहे. ज्यामुळे गोलंदाजांनाही मदत होऊ शकते, परंतु गेल्या काही सामन्यांमध्ये नॅथली जर्मनोस आणि अंजुम चोप्रा यांनीही येथे खूप धावा केल्या आहेत. म्हणजेच या खेळपट्टीवर रोमांचक सामन्याची आशा आहे.