scorecardresearch

“CSK शिवाय तो…”, महेंद्रसिंह धोनीबाबत एन. श्रीनिवासन यांचं मोठं वक्तव्य!

पुढील IPLमध्ये धोनीसाठी CSKकडून रिटेन्शन कार्ड वापरलं जाईल, असं समोर आलं होतं. आता श्रीनिवासन यांनी…

“CSK शिवाय तो…”, महेंद्रसिंह धोनीबाबत एन. श्रीनिवासन यांचं मोठं वक्तव्य!
श्रीनिवासनसोबत धोनी

आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा (सीएसके) कर्णधार महेंद्रसिंह धोनीबद्दल मोठी प्रतिक्रिया समोर आली आहे. इंडिया सिमेंट्सचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एन. श्रीनिवासन यांनी धोनीबद्दल मोठे विधान केले आहे. ”धोनीशिवाय सीएसके ​​आणि सीएसके शिवाय धोनी नाही”, असे श्रीनिवासन यांनी म्हटले आहे.

धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाइट रायडर्सचा पराभव करत चौथ्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावले. ही चारही जेतेपदे सीएसकेने धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकली आहेत. चेन्नईने २०१०, २०११, २०१८ आणि २०२१चे विजेतेपद पटकावले आहे. तीन दशकात आयपीएल जेतेपदे जिंकणारा धोनी एकमेव कर्णधार आहे.

पुढील वर्षी एक मोठा लिलाव होणार आहे आणि दोन नवीन संघ देखील आयपीएलमध्ये सामील होणार आहेत. अशा स्थितीत सर्व संघांना त्यांच्या खेळाडूंची नव्याने निवड करावी लागेल. त्याचबरोबर त्याला काही खेळाडूंना कायम ठेवण्याचीही संधी मिळणार आहे. कोणता संघ कोणत्या खेळाडूला कायम ठेवेल याबाबत बराच गोंधळ होणार आहे कारण सर्व संघांकडे अनेक महान खेळाडू आहेत.

हेही वाचा – T20 WC: भारतीय संघाच्या खेळाडूंनी घेतला पाकिस्तानच्या बाबर आझमच्या फलंदाजीचा आनंद; फोटो व्हायरल

अशा स्थितीत धोनी पुढील आयपीएल खेळेल, की नाही याबाबत अटकळ बांधली जात होती. मीडियाशी संभाषण करताना श्रीनिवासन यांनी धोनीला कायम ठेवण्याचे संकेत दिले. “धोनी चेन्नई सुपर किंग्ज, चेन्नई आणि तामिळनाडूचा एक भाग आहे.”

याआधी, सीएसकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले होते, की लिलावात त्यांची टीम धोनीसाठी पहिले रिटेन्शन कार्ड वापरेल. तर धोनीनेही चेपॉक स्टेडियमवर निरोपाचा सामना खेळणार असल्याचे म्हटले होते. याचा अर्थ धोनी पुढील आयपीएलमध्ये खेळू शकतो.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-10-2021 at 15:20 IST

संबंधित बातम्या