Tokyo Olympics: “आमचा विजय करोना योद्ध्यांना समर्पित”; कर्णधार मनप्रीत सिंगने व्यक्त केल्या भावना

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने इतिहास रचला असून कांस्यपदक मिळवलं आहे

Tokyo 2020 Hockey, India vs Germany, India Wins Hockey Match, India Beats Germany,
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने इतिहास रचला असून कांस्यपदक मिळवलं आहे

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने इतिहास रचला असून कांस्यपदक मिळवलं आहे. तब्बल ४१ वर्षांनी भारताने हॉकीमध्ये पदक मिळवलं असून सुवर्णअक्षरात लिहिलं जाईल अशी कामगिरी केली आहे. भारताने बलाढ्य अशा जर्मनीचा ५-४ फरकाने पराभव केला आणि कांस्यपदकावर नाव कोरलं. दरम्यान भारतीय संघाचा कर्णधार मनप्रीत सिंगने हा विजय करोना योद्धे आणि पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांसाठी समर्पित करत असल्याचं म्हटलं आहे.

“हे पदक आपल्या देशातील सर्व करोना योद्धे आणि पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांसाठी आहे,” अशी भावना मनप्रीतने सामना संपल्यानंतर व्यक्त केली आहे.

Tokyo 2020 Hockey: …अन् शेवटच्या सहा सेकंदांमध्ये भारताने सामना जिंकला; ४१ वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवला

भारताने बलाढ्य जर्मनीचा ५-४ ने पराभव करत ४१ वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवला. सुरुवातीला आघाडी घेतलेल्या जर्मनीला भारतीय संघाने जबरदस्त पुनरागमन करत पराभवाची धूळ चारली. दरम्यान यलो कार्डमुळे मैदानात एक खेळाडू कमी असल्याने जर्मनीने मोठा निर्णय घेतला होता. भारतीय संघाची खेळी पाहून जर्मनी गोलकीपरशिवाय खेळली.

Tokyo 2020 Hockey: …आणि भारताच्या धसक्यानं गोलकीपरशिवाय खेळली जर्मनी

भारताकडे ५-४ अशी आघाडी असताना काही करून बरोबरी करण्याच्या उद्देशानं जर्मनीनं आपलं आक्रमण वाढवण्याचा निर्णय घेतला. भारताची बचावफळी भेदता येत नसल्याचे व अनेक पेनल्टी कॉर्नरवर गोल करता येत नसल्याचे बघून जर्मनीनं गोलकीपरशिवाय खेळून एक आक्रमक खेळाडू खेळवण्याचा निर्णय सामना संपायला काही मिनिटं असताना घेतला. त्यांचा हा निर्णय अचूक ठरण्याची शक्यताही निर्माण झाली. परंतु शेवटच्या सहा सेकंदांमध्ये भारताच्या गोलकीपरनं व बचावफळीनं अप्रतिम बचावाचं दर्शन घडवलं व जर्मनीचे मनसुबे धुळीला मिळवले आणि कांस्यपदकावर नाव कोरलं.

Tokyo 2020 Hockey: ४१ वर्षांनी भारतीय हॉकी टीमनं घडवला इतिहास, कांस्यपदकावर कोरलं नाव

झालं असं की, सामना अगदी शेवटच्या मिनिटामध्ये पोहचला तेव्हा जर्मनी भारताकडे असलेली एक गोलची आघाडी मोडून काढण्यासाठी प्रयत्न करत होता. गोलकीपरशिवाय खेळणाऱ्या जर्मनीला सामन्यातील आपलं आव्हान टिकवून ठेवण्यासाठी आणि अतिरिक्त वेळ किंवा पेनल्टी शूट आऊटपर्यंत सामना नेण्यासाठी सामनाबरोबरीत सोडवणं आवश्यक होतं. याच प्रयत्नात असतानाच अगदी सामन्यातील शेवटचे सहा सेकंद शिल्लक होते तेव्हा जर्मनीला पेनल्टी कॉर्नर मिळाला. ही जर्मनीची शेवटची संधी होती. कारण हा गोल झाल्यास सामना बरोबरीत सुटणार होता तर दुसरीकडे भारताने हा गोल वाचवल्यास ४१ वर्षांनी पदकावर नाव कोरणार होता. पंचांनी शिट्टी वाजवताच जर्मनीने गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय गोलपोस्टजवळ भिंत बनून उभ्या असणाऱ्या गोलपकीपरने म्हणजेच श्रीजेशने हा प्रयत्न हाणून पाडला आणि भारतीय खेळाडूंनी मैदानात एकच जल्लोष केला. हा गोल झाला असता तर सामना अतिरिक्त वेळेत गेला असता आणि तिथेही गोल झाला नसता तर पेनल्टी शूट आऊटने विजेता निश्चित करण्यात आला असता. मात्र भारतीय संघाने आपला संयम कायम राखत सामना ५-४ च्या फरकाने जिंकला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Tokyo olympics skipper manpreet singh dedicates historic hockey bronze to covid warriors and frontline workers sgy

ताज्या बातम्या