उदयोन्मुख खेळाडू पी.व्ही.सिंधूला मलेशिया ग्रां.प्रि.गोल्ड स्पर्धेसाठी अग्रमानांकन देण्यात आले आहे. ३० एप्रिलपासून कुआलालंपूर येथे ही स्पर्धा सुरू होत आहे. जागतिक क्रमवारीत १५व्या स्थानी असणाऱ्या सिंधूची सलामीची लढत चेन जिआयुनशी होणार आहे. सिंधूव्यतिरिक्त पी.सी. तुलसी, अरुंधती पनतावणे आणि तन्वी लाड मुख्य फेरीत तर मुद्रा धैनजे, रितुपर्णा दास आणि जी.रुथविका शिवानी पात्रता फेरीत सहभागी होणार आहेत.
पुरुषांमध्ये आरएमव्ही गुरुसाईदत्तला अकरावे मानांकन देण्यात आले आहे. त्याची सलामीची लढत सिंगापूरच्या चाओ ह्य़ुआंगशी होणार आहे. इंडिया ओपन स्पर्धेत तौफिक हिदायतला पराभवाचा धक्का देणाऱ्या एस.प्रणॉयला पाचवे मानांकन देण्यात आले असून त्याची पहिली लढत इंडोनेशियाच्या टॉमी सुर्गितोशी होणार आहे. पुरुषांमध्ये समीर वर्मा, अभिमन्यू सिंग, ऑस्कर बन्सल आणि के.श्रीकांत सहभागी होणार आहेत. एस. संजीथ आणि जगदीश यादव मुख्य फेरीच्या पुरुष दुहेरीत तर डी.गुरु आणि विनीथ मॅन्युल पात्रता फेरीत खेळणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 28th Apr 2013 रोजी प्रकाशित
सिंधूला अग्रमानांकन
उदयोन्मुख खेळाडू पी.व्ही.सिंधूला मलेशिया ग्रां.प्रि.गोल्ड स्पर्धेसाठी अग्रमानांकन देण्यात आले आहे. ३० एप्रिलपासून कुआलालंपूर येथे ही स्पर्धा सुरू होत आहे. जागतिक क्रमवारीत १५व्या स्थानी असणाऱ्या सिंधूची सलामीची लढत चेन जिआयुनशी होणार आहे.
First published on: 28-04-2013 at 01:31 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Top seeding to p v sindhu