टी-२० वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाने अफगाणिस्तानचा मोठ्या फरकाने पराभव करत आपल्या गुणांचे खाते उघडले. मोठा विजय मिळाल्याने भारताने वर्ल्डकप स्पर्धेत आपले आव्हान कायम राखले आहे. मात्र अफगाणिस्तानच्या कामगिरीवर टीका होत आहे. सामन्यादरम्यानचे अनेक मुद्दे फिक्सिंगच्या गोष्टीला खतपाणी घालत असल्याचेही समोर आले. या सामन्यानंतर सोशल मीडियावर नेटिझन्सनी फिक्सिंग झाल्याचे म्हटले. अशातच एक व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओवरूनही नेटकऱ्यांनी आपली शंका व्यक्त केली.

भारत-अफगाणिस्तान सामन्यादरम्यानचा नाणेफेकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात अफगाणिस्तानचा कप्तान मोहम्मद नबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. व्हिडिओमध्ये टॉस होण्यापूर्वी विराट नबीला ”तू गोलंदाजी घेणार आहेस”, असे म्हणताना ऐकायला आले. नाणेफेक झाल्यानंतर नबीने गोलंदाजी घेतली.

हेही वाचा – T20 WC : ‘हा’ संघ जिंकणार वर्ल्डकप; वीरेंद्र सेहवागची ‘मोठी’ भविष्यवाणी!

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी शंका घेतली. माजी क्रिकेटपटू डेव्हिड गावर आणि राशिद लतीफ यांनी याबाबत मते दिली. PTV स्पोर्ट्सवर दिलेल्या मुलाखतीत गावर म्हणाले, ”माझ्यासाठी यात काळजी करण्यासारखे काही नाही, या अशा गोष्टी तुम्ही लक्ष घातल्यानंतर मोठ्या होतात. पण या खोलीत असे मत मांडणारा मी एकमेव माणूस नाही, हे जाणतो.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू राशिद लतीफ यांनीही मत दिले. ते म्हणाले, “जेव्हा दोन कर्णधारांमध्ये नाणेफेक होते, तेव्हा एक कर्णधार दुसर्‍याला सांगतो की त्याला काय करायचे आहे. म्हणून नबीने कोहलीला सांगितले की ‘आम्ही आधी गोलंदाजी करू’. मात्र, नंतर तुम्हाला तेच अधिकृतपणे सांगावे लागेल, म्हणून त्याने त्याची पुनरावृत्ती केली. यात शंका घेण्यासारखे काही नाही.”