दुबई : कमालीच्या अनिश्चिततेनंतरही लोकप्रिय असलेल्या ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील आशियाई देशांमधील रणसंग्रामाला शनिवारपासून सुरुवात होत आहे. आशियाई वर्चस्वाचे उद्दिष्ट असले, तरी आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा डोळय़ांसमोर ठेवूनच उपखंडातील संघ आपली रणनीती निश्चित करेल. अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील लढतीने या स्पर्धेला प्रारंभ होईल.

अफगाणिस्तान-श्रीलंका संघांदरम्यान सलामीची लढत असली, तर तमाम क्रिकेटप्रेमींसाठी रविवारी स्पर्धेची सुरुवात होणार आहे. अफगाणिस्तान संघ मोहम्मद नबीच्या नेतृत्वाखाली अव्वल संघाला पराभूत करण्याचे स्वप्न बाळगून आहे. तथापि, श्रीलंका संघ खेळाडूंच्या दुखापतींनी त्रस्त आहे. त्यांचे सारेच वेगवान गोलंदाज अननुभवी असल्यामुळे, फिरकी गोलंदाजांचे यश श्रीलंकेसाठी महत्वाचे ठरेल.