१९ वर्षाखालील एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने अवघ्या २९ चेंडूत विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना जपानचा संघ अवघ्या ४१ धावांत गारद झाला होता. त्यानंतर ४२ धावांचे अतिशय सोपे आव्हान भारताच्या सलामीवीरांनीच पार केले. जपानच्या फलंदाजांचा भारतीय गोलंदाजांनी अक्षरश: धुव्वा उडवला.

U-19 World Cup 2020 : भारत अवघ्या २९ चेंडूत ‘यशस्वी’; उडवला जपानचा धुव्वा

भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय अगदी सार्थ ठरवला. भारताच्या रवि बिश्नोई, कार्तिक त्यागी, आकाश सिंग आणि विद्याधर पाटील या चौघांच्या तोफखान्यापुढे जपानचा डाव ४१ धावांत आटोपला. जपानच्या एकाही खेळाडूला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. जपानचे बाद झालेले फलंदाज १,७,०,०,०,०,०,७,५,१ अशा धावसंख्येवर बाद झाले. नील दाते, देबाशिष साहू, काझुमासा ताकाहासी, इशान फर्ट्याल आणि अश्ले थर्गेट या पाच फलंदाजांना तर भोपळाही फोडता आला नाही. निम्मा संघ शून्यावर बाद झाला. केवळ शू नोगुची आणि केन्तु डोबेल या दोघांनी सर्वाधिक प्रत्येकी ७ धावा केल्या. तर नाबाद राहिलेल्या सोरा इचिकीलाही १ धावा करता आली. ४१ धावांपैकी फलंदाजांनी एकूण २२ धावा केल्या. १९ धावा अवांतर होत्या.

भारताला जबर धक्का; ‘इन-फॉर्म’ फलंदाज न्यूझीलंड दौऱ्यातून OUT

भारताकडून रवि बिश्नोईने सर्वाधिक ४ बळी टिपले. त्याने ८ षटकांपैकी ३ षटके निर्धाव टाकली आणि केवळ ५ धावा दिल्या. कार्तिक त्यागीने ६ षटकात १० धावा देऊन ३ बळी घेतले. आकाश सिंगला ४.५ षटकात ११ धावा पडल्या पण त्याने २ गडी बाद केले. तर विद्याधर पाटीलनेदेखील ४ षटकात ८ धावांत १ बळी टिपला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

४२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल याने धमाकेदार खेळी केली. त्याने १८ चेंडूत नाबाद २९ धावा कुटल्या. त्या खेळीत यशस्वीने ५ चौकार आणि १ षटकार लगावला. त्याला कुमार कुशाग्र याने चांगली साथ दिली. कुमारने ११ चेंडूच नाबाद १३ धावा केल्या. त्यात २ चौकार होते. जपानविरूद्धच्या सामन्यातील विजयामुळे भारताने या विश्वचषक स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला.