मुंबईकर यशस्वी जैस्वालने १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत पुन्हा एकदा आपली चमक दाखवली आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशी गोलंदाजांनी हवामानाचा फायदा घेत यशस्वी जैस्वाल आणि दिव्यांश सक्सेना जोडीला तंगवलं. सक्सेना झटपट माघारी परतल्यानंतर यशस्वी जैस्वालने एक बाजू लावून धरत आपलं अर्धशतक झळकावलं.

या अर्धशतकी खेळीसह यशस्वी जैस्वालने शिखर धवनचा विक्रम मोडीत काढला आहे. १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिकवेळा ५० किंवा त्यापेक्षा जास्त धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत यशस्वी आता सर्फराज खानसोबत संयुक्तपणे पहिल्या स्थानी आलेला आहे.

२०२० विश्वचषक स्पर्धेत यशस्वी जैस्वालची फलंदाजीतली आतापर्यंतची कामगिरी –

  • विरुद्ध श्रीलंका – ५९ धावा
  • विरुद्ध जपान – २९ धावा*
  • विरुद्ध न्यूझीलंड – ५७ धावा*
  • विरुद्ध ऑस्ट्रेलिया – ६२ धावा
  • विरुद्ध पाकिस्तान – १०५ धावा*