Ind Vs Eng Test: ‘तोंड बंद ठेव नी बॅटिंग कर’; स्टुअर्ट ब्रॉडला अंपायरनं दिली तंबी

जसप्रीत बुमराहने त्याला टाकलेल्या शॉर्ट बॉलबद्दल तक्रार करण्यासाठी तो अंपायर केटलबरोकडे गेला होता.

Stuart Broad
फोटो सौजन्य – इंडियन एक्सप्रेस

भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान सुरू असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यादरम्यान, चौथ्या दिवशी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याला अंपायर रिचर्ड केटलबरो यांनी चांगलेच फटकारले. ‘तोंड बंद ठेव नी बॅटिंग कर’, असा सल्ला रिचर्ड केटलबरो यांनी स्टुअर्ट ब्रॉडला दिला.

इंग्लंड पहिल्या डावात फलंदाजी करत असताना स्टुअर्ट ब्रॉड भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराहने त्याला टाकलेल्या शॉर्ट बॉलबद्दल तक्रार करण्यासाठी अंपायर केटलबरोकडे गेला होता. मात्र, केवळ पाच चेंडू खेळलेल्या ब्रॉडला अंपायरने चांगलेच फटकारले. मला माझी अंपायरिंग करू दे आणि तु जाऊन बॅटिंग कर, नाही तर तु पुन्हा संकटात येईल, असे म्हणत अंपायने ब्रॉडला बॅटिंग करण्यास पाठवले.

तत्पूर्वी, चौथ्या दिवशीचा खेळ संपला तेंव्हा इंग्लंडची धावसंख्या ३ बाद २५९ एवढी होती. जो रूट (नाबाद ७६ धावा) आणि जॉनी बेअरस्टो (नाबाद ७३) यांच्या अप्रतिम फलंदाजीमुळे पाचव्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडला विजयाची संधी निर्माण झाली आहे. मात्र, यासोबतच भारताच्या मालिका विजयाच्या आशा धूसर झाल्या आहेत. भारताने दिलेल्या ३७८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची चौथ्या दिवसअखेर ३ बाद २५९ अशी धावसंख्या होती. त्यांना विजयासाठी आणखी ११९ धावांची गरज आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Umpire richard kettleborough scolds stuart broad during india vs england test match at edgbaston

Next Story
विराटबद्दल सेहवागचं वादग्रस्त वक्तव्य; सेहवागला समालोचक म्हणून काढून टाकण्याची क्रिकेट रसिकांची मागणी, पाहा Viral Video
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी