मुंबई इंडियन्स संघाने पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएल स्पर्धेसाठी उन्मुक्त चंद व आर. विनयकुमार यांना करारबद्ध केले आहे. चंदला मुंबईने राजस्थान रॉयल्सकडून आपल्या संघात घेतले आहे, तर विनयकुमारला कोलकाता नाइट रायडर्सकडून घेण्यात आले आहे. आगामी आयपीएल स्पर्धेसाठी खेळाडूंच्या देवाणघेवाण प्रक्रियेला नुकताच प्रारंभ झाला आहे. मुंबईने मायकेल हसी व प्रवीणकुमार यांना आपल्याबरोबरच्या करारामधून मुक्त केले. देवाणघेवाण प्रक्रियेची पहिली मुदत १२ डिसेंबर रोजी संपणार आहे. ही स्पर्धा पुढील वर्षी ८ एप्रिल ते २४ मे या कालावधीत होणार आहे. आयपीएल स्पर्धेच्या व्यवस्थापन समितीच्या बैठकीत या तारखांना मंजुरी देण्यात आली. २०१६ व २०१७ च्या स्पर्धाची कार्यक्रमपत्रिका या वेळी निश्चित करण्यात आली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 5th Nov 2014 रोजी प्रकाशित
उन्मुक्त चंद मुंबई इंडियन्सकडून खेळणार
मुंबई इंडियन्स संघाने पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएल स्पर्धेसाठी उन्मुक्त चंद व आर. विनयकुमार यांना करारबद्ध केले आहे. चंदला मुंबईने राजस्थान रॉयल्सकडून आपल्या संघात घेतले आहे, तर विनयकुमारला कोलकाता नाइट रायडर्सकडून घेण्यात आले आहे.
First published on: 05-11-2014 at 02:23 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unmukt chand r vinay kumar join mumbai indians