US Open Final : रागारागात रॅकेट तोडली, त्यानंतर टॉवेलमध्ये रडू लागला जोकोव्हिच..! पाहा VIDEO

सामना गमावल्यानंतर जोकोव्हिच बेंचवर बसला, त्यानं टॉवेल काढलं आणि..

us open 2021 novak djokovic crying into his towel after smashing a racket
जोकोव्हिचचे सर्वाधिक २१वे ग्रँडस्लॅम जेतेपद आणि ‘कॅलेंडर स्लॅम’ हे दोन विक्रम पूर्ण होण्याचे स्वप्न भंगले.

सर्बियाचा अग्रमानांकित खेळाडू नोव्हाक जोकोव्हिचचे सर्वाधिक २१वे ग्रँडस्लॅम जेतेपद आणि ‘कॅलेंडर स्लॅम’ हे दोन विक्रम पूर्ण होण्याचे स्वप्न पूर्ण होता होता राहिले. जोकोविचला रविवारी रात्री अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. रशियाच्या दुसऱ्या मानांकित डॅनिल मेदवेदेवने जोकोविचचा पराभव करत आपले पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले. या सामन्यासाठी प्रेक्षकांनी टेनिस कोर्टात गर्दी केली होती, शिवाय या दोघांना प्रोत्साहन देण्यात चाहते कुठेही कमी पडले नाहीत. सामना संपताच जोकोव्हच आपल्या टॉवेलमध्ये रडायला लागला.

सामन्या सुरुवातीपासूीनच मेदवेदेवने आक्रमक सुरुवात केली. तर जोकोव्हिच दबावात खेळताना दिसून आला. मेदवेदेवने जोकोविचचा ६-४, ६-४, ६-४ असा पराभव केला. सुमारे अडीच तास चाललेल्या या सामन्यात जोकोविच प्रत्येक सेटमध्ये मेदवेदेवच्या मागे राहिला. सामना संपल्यानंतर मेदवेदेव थकून कोर्टवरच झोपला. तर जोकोव्हिच बेंचवर बसून आपल्या टॉवेलमध्ये रडायला लागला. सामना मेदवेदेवने जिंकला असला, तरी उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षकांनी जोकोव्हिचचे उभे राहून आणि टाळ्या वाजवत कौतुक केले. आपल्या स्वप्नाला तडा गेल्याचे पाहून जोकोव्हिच रडायला लागला.

 

 

 

 

हेही वाचा – ENG vs IND : ‘‘जर अजिंक्य चांगला खेळला नाही, तर त्याला…”, सेहवागनं स्पष्टच सांगितलं…

सामन्यादरम्यान तोडले रॅकेट

सामन्यावर मेदवेदेव पकड घेत होता. सामना सुरू होऊन सुमारे दीड तास उलटले होते, पण मेदवेदेवची आघाडी अबाधित राहिली. जोकोव्हिच पुन्हा पुन्हा प्रयत्न करत होता, पण मेदवेदेव आपले सर्व प्रयत्न करत होता. निराश होऊन जोकोविचने आपली रॅकेट तीन वेळा कोर्टवर आपटली.

 

स्वप्नभंग

जोकोव्हिचने या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन विजेतेपद पटकावले होते. जर त्याने यूएस ओपन जिंकले असते, तर तो एका वर्षात सर्व चार ग्रँडस्लॅम जिंकणारा, म्हणजेच कॅलेंडर स्लॅम जिंकणारा खेळाडू बनला असता. सध्या, रॉड लेव्हरने पुरुषांमध्ये वर्षभरात चारही ग्रँडस्लॅम जेतेपदे जिंकली. लेव्हरने १९६२ आणि १९६९ मध्ये ही कामगिरी केली होती. महिलांमध्ये स्टेफी ग्राफने १९८८ साली हा विक्रम तिच्या नावावर केला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Us open 2021 novak djokovic crying into his towel after smashing a racket adn