वृत्तसंस्था, न्यूयॉर्क : ग्रीसच्या तिसऱ्या मानांकित मारिया सक्कारी आणि फ्रान्सच्या कॅरोलिन गार्सियाने सोमवारपासून सुरू झालेल्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतील महिला एकेरी गटाच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. पहिल्या फेरीच्या सामन्यात सक्कारीने जर्मनीच्या तात्जना मारियावर ६-४, ३-६, ६-० असा विजय मिळवला. या सामन्यातील पहिला सेट जिंकत सक्कारीने चांगली सुरुवात केली, पण तात्जनाने दुसऱ्या सेटमध्ये बाजी मारत सामना बरोबरीत आणला. तिसऱ्या सेटमध्ये सक्कारीने तात्जनाला पुनरागमनाची कोणतीच संधी न देता दुसरी फेरी गाठली. अन्य लढतीत, गार्सियाने कामिलिया राखिमोव्हाला ६-२, ६-४ असे सरळ सेटमध्ये नमवत पुढच्या फेरीतील स्थान निश्चित केले.

तसेच अमेरिकेच्या अ‍ॅलिसन रिस्के-अमृतराजने एलेना यू हिला ६-२, ६-४ असे पराभूत केले. १८व्या मानांकित व्हेरॉनिका कुदेरमेतोव्हाने क्रोएशियाच्या डॉना व्हेकिचला ७-५, ६-३ असे सरळ सेटमध्ये नमवले, तर स्वीडनच्या रेबेका पीटरसनने अ‍ॅना कलिन्स्कायाकडून ४-६, ३-६ अशी हार पत्करली. त्याचप्रमाणे कोलंबियाचीखेळाडू कॅमिला ओसोरियोने  अमेरिकेच्या अ‍ॅन ली हिच्यावर १-६, ६-३, ६-१ असा विजय साकारला.

अगुटला पराभवाचा धक्का

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्पेनच्या १६व्या मानांकित रोबेटरे बटिस्टा अगुटचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत अमेरिकेच्या बिगरमानांकित जेजे वोल्फने अगुटवर ६-४, ६-४, ६-४ अशी सरळ सेटमध्ये मात केली.