USA Beat Bangladesh by 5 Wickets: आगामी वर्ल्डकपपूर्वी टी-२० क्रिकेटमध्ये अमेरिकेने बांगलादेश संघाला पराभूत करत मोठा ठसा उमटवला आहे. टी-२० क्रमवारीत १९व्या क्रमांकावर असलेल्या युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका म्हणजेच यूएसए क्रिकेट संघाने टेक्सासमध्ये जगातील नवव्या क्रमांकावर असलेल्या बांगलादेशचा पाच विकेट्सने पराभव करून सर्वांनाच चकित केले. अमेरिकेने बांगलादेशचा ५ गडी राखून पराभव केला. अमेरिकेने बहुतेक वेळ सामन्यात आपले वर्चस्व कायम राखले आणि तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
२०२१ मध्ये आयर्लंडविरुद्धच्या विजयानंतर अमेरिकेचा हा दुसरा टी२० विजय आहे. यूएसए आणि बांगलादेश हे दोन्ही संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच आमनेसामने आले होते आणि पहिल्याच सामन्यात यूएसएने बांगलादेशला हरवून इतिहास रचला. यंदाच्या टी-२० विश्वचषकातही अमेरिकेचा संघ सहभागी झाला आहे.
USA beat Bangladesh in their first meeting in men's T20Is in a thrilling match in Houston ?
— ICC (@ICC) May 21, 2024
The co-hosts ramp up their #T20WorldCup preparations with a stunning victory! #USAvBAN ?: https://t.co/TM2WIVwhAE pic.twitter.com/aovBUIKziC
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात अमेरिकेचा भारतीय वंशाचा कर्णधार मोनांक पटेलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. बांगलादेशने निर्धारित २० षटकांत ६ गडी गमावून १५३ धावा केल्या होत्या. एक वेळ अशी होती जेव्हा बांगलादेशची धावसंख्या ११.४ षटकांत ४ विकेट गमावत केवळ ६८ धावा होती. येथून तौहीद हृदय आणि महमुदुल्लाह यांनी संघाचा डाव सावरला आणि संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले.
जिथे तौहीदने ४७ चेंडूत ५८ धावा केल्या. तर महमुदुल्लाहने २२ चेंडूत ३१ धावांची चांगली खेळी केली. अमेरिकेकडून स्टीव्हन टेलरने सर्वाधिक २ विकेट घेतले. सौरभ नेत्रावलकर, अली खान आणि जसदीप सिंग यांना प्रत्येकी एक विकेट मिळवण्यात यश आले. भारताचा १९ वर्षांखालील माजी क्रिकेटपटू हरमीत सिंगने १५४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अमेरिकेसाठी विजयी धावा केल्या. सलग तीन षटकार मारून त्याने सामना अमेरिकेकडे वळवला. १३ चेंडूत नाबाद ३३ धावा केल्यानंतर तो खेळ संपेपर्यंत मैदानावर राहिला. त्याने कोरी अँडरसनसोबत सहाव्या विकेटसाठी भागीदारी करताना ४.४ षटकांत ६२ धावा जोडल्या. कोरी अँडरसनही ३४ धावा करून नाबाद राहिला.
Our Man of the Match for the first T20i against Bangladesh! ?#USAvBAN #WeAreUSACricket ?? pic.twitter.com/75jbgsi9dx
— USA Cricket (@usacricket) May 21, 2024
बांगलादेशकडून मुस्तफिजुर रहमानने २ विकेट घेतले. शरीफुल इस्लाम आणि रिशाद हुसेन यांनाही प्रत्येकी १ विकेट मिळाली. अमेरिकेकडून स्टीव्हन टेलरने २८ आणि अँड्र्यू गूसने २३ धावांचे योगदान दिले. अमेरिकेसाठी बांगलादेशवर मिळवलेला विजय त्यांच्यासाठी आगामी विश्वचषकाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.