जमैकाचा विश्वविक्रमवीर धावपटू उसेन बोल्ट हा दुखापतीमधून पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून, आगामी जागतिक रिले शर्यतीत भाग घेण्यासाठी तो उत्सुक आहे. १०० व २०० मीटर धावण्याचे विश्वविक्रम बोल्टच्या नावावर आहेत.
ऑलिम्पिकमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजविणाऱ्या बोल्टने पायाच्या दुखापतीमुळे गेल्या मोसमातील बहुंताश वेळ विश्रांती घेतली होती. ऑगस्टमध्ये जागतिक मैदानी स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत पुन्हा सोनेरी कामगिरी करण्याचे बोल्टचे ध्येय आहे. तो म्हणाला, ‘‘मी आता शंभर टक्के तंदुरुस्त आहे. आगामी रिले शर्यत ही माझ्या तंदुरुस्तीची चाचणीच असणार आहे. बीजिंग येथील जागतिक मैदानी स्पर्धा होईपर्यंत जास्त ताण न घेता दुखापती टाळण्याचा सल्ला मला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.’’
बोल्टने पुढे सांगितले की, ‘‘मला आता शर्यतींवर अधिक लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. बराच काळ मी स्पर्धात्मक अॅथलेटिक्सपासून दूर होतो. माझ्या कामगिरीत अधिकाधिक प्रगती करण्यावर माझा भर राहील. सराव व प्रत्यक्ष स्पर्धा यामध्ये खूप फरक असतो. त्यामुळेच मी सुरुवातीला खूप वेगाने धाव घेणे मला शक्य होणार नाही. हळूहळू वेग वाढविण्यावर माझा भर राहील. छ’
संग्रहित लेख, दिनांक 3rd May 2015 रोजी प्रकाशित
सावधान, बोल्ट पुन्हा येत आहे!
जमैकाचा विश्वविक्रमवीर धावपटू उसेन बोल्ट हा दुखापतीमधून पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून, आगामी जागतिक रिले शर्यतीत भाग घेण्यासाठी तो उत्सुक आहे. १०० व २०० मीटर धावण्याचे विश्वविक्रम बोल्टच्या नावावर आहेत.
First published on: 03-05-2015 at 12:34 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Usain bolt returning