जमैकाचा विख्यात धावपटू युसेन बोल्टने सलग तिसऱ्यांदा लॉरियसचा जगातील सर्वोत्तम क्रीडापटू बनण्याचा मान पटकावला. लंडन ऑलिम्पिकमध्ये १०० मीटर, २०० मीटर तसेच ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीत सुवर्णपदकांची नोंद करणाऱ्या बोल्टने दिग्गज खेळाडूंना मागे टाकत या पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली. ब्रिटनची हेप्टॅथलॉनपटू जेसिका इन्निस हिने जगातील सर्वोत्तम महिला खेळाडूचा पुरस्कार पटकावला. अमेरिकन ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणाऱ्या ब्रिटनच्या अँडी मरेने ‘ब्रेक थ्रू’ पुरस्कारावर नाव कोरले. अद्वितीय कामगिरीबद्दलचा पुरस्कार अमेरिकेचा महान जलतरणपटू मायकेल फेल्प्स याला देण्यात आला. लंडन ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धेच्या संयोजन समितीचे अध्यक्ष सेबॅस्टियन कोए यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 14th Mar 2013 रोजी प्रकाशित
युसेन बोल्ट सलग तिसऱ्यांदा लॉरियस पुरस्काराचा मानकरी
जमैकाचा विख्यात धावपटू युसेन बोल्टने सलग तिसऱ्यांदा लॉरियसचा जगातील सर्वोत्तम क्रीडापटू बनण्याचा मान पटकावला. लंडन ऑलिम्पिकमध्ये १०० मीटर, २०० मीटर तसेच ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीत सुवर्णपदकांची नोंद करणाऱ्या बोल्टने दिग्गज खेळाडूंना मागे टाकत या पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली.
First published on: 14-03-2013 at 03:45 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Usain bolt third time loeries award winner