टीम इंडियाचा फलंदाज आणि मर्यादित षटकांच्या संघाचा उपकर्णधार केएल राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीचे नाते अधिकृत झाले आहे. दोघेही अनेकदा एकत्र दिसतात. ते आपले फोटोही सोशल मीडियावर शेअर करतात. आज व्हॅलेंटाईन डेला राहुलने इंस्टाग्रामवर अथियासोबतचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये दोघेही एकत्र फिरताना दिसत आहेत.

फोटोमध्ये अथिया मिरर सेल्फी घेताना दिसत आहे तर केएल राहुल तिच्यासोबत आहे. राहुलने पोस्टच्या कॅप्शनमध्ये हॅपी व्हॅलेंटाईन डे असे म्हटले आहे. अथिया आयपीएल २०२१ आणि टी-२० वर्ल्डकप २०२१मध्ये राहुलला चिअर करण्यासाठी यूएईमध्ये होती. केएल राहुल वेस्ट इंडीजविरुद्धच्या वनडे आणि टी-२० संघाचा भाग होता. मात्र दुखापतीमुळे त्याला तिसऱ्या वनडे आणि टी-२० मालिकेतून बाहेर पडावे लागले आहे.

Job Opportunity Opportunities in Indo Tibetan Border Police Force
नोकरीची संधी: इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस फोर्समधील संधी
SYMBIOSEXUAL
तुम्ही सुद्धा ‘Symbiosexual’ आहात का? ही नवीन लैंगिक ओळख नेमकी काय आहे? इंटरनेटवर याची इतकी चर्चा का?
Rajkot Crime News
Rajkot News : ‘माफ कर आई, मी तुला मारलं, तुझी आठवण येते’; आईची हत्या केल्यानंतर मुलाने इन्स्टाग्रामवर स्टोरी ठेवत फोटो केला शेअर
Road Connecting Baroda to Statue Of Unity Broken
Statue of Unity : बडोदा ते स्टॅच्यू ऑफ युनिटीला जोडणारा रस्ता तुटला, काँग्रेसने व्हिडीओ पोस्ट करत विचारला खोचक प्रश्न
Udupi woman
Udupi Rape Case : इन्स्टाग्रामवरील मैत्री महागात! मित्राने दारू पाजून तरुणीवर केला बलात्कार; भाजपाकडून ‘लव्ह जिहाद’चा आरोप
Telegram CEO Pavel Durov Arrest
Telegram CEO Pavel Durov Arrest: टेलीग्राम ॲपचे सीईओ पावेल दुरोव्ह यांना फ्रान्समध्ये अटक; Telegram App वादात का?
Nagpur life imprisonment latest marathi news
हनीट्रॅपमध्ये फसला, ब्रह्मोसची माहिती पाकिस्तानला दिली…जन्मठेप मिळताच…
KL Rahul Retirement Viral Instagram Story Fact Check
KL Rahul: केएल राहुलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जाहीर केली निवृत्ती? काय आहे व्हायरल इन्स्टाग्राम स्टोरीमागचं सत्य
केएल राहुलची पोस्ट

हेही वाचा – एक पाऊल भविष्याकडे..! BCCI प्रमुख गांगुलीची ‘मोठी’ घोषणा; ट्वीट करत म्हणाला…

अथिया ही अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी आहे. तिने २०१५ बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अथियाने ‘हीरो’ चित्रपटात पहिल्यांदा काम केले. ती ‘मुबारक’ आणि ‘मोतीचूक चकनाचूर’ या चित्रपटांतही झळकली आहे. बॉलिवूड आणि क्रिकेट या दोन क्षेत्रांचे नाते फार जवळचे आहे. बॉलिवूड आणि क्रिकेटमधल्या बऱ्याच जोड्या आजवर चर्चेत राहिल्या आहेत. या जोड्यांपैकी विराट कोहली-अनुष्का शर्मा, झहीर खान-सागरिका घाटगे आणि युवराज सिंग-हेजल कीच यांनी लग्नगाठसुद्धा बांधली आहे. त्यातच आता अथिया व राहुल या जोडीची भर पडली आहे.