वंदना कटारियाच्या दुहेरी गोलच्या बळावर भारताने जागतिक हॉकी लीग स्पध्रेच्या दुसऱ्या फेरीत मलेशियाचा ३-० असा पराभव केला. सामन्याच्या ९व्या मिनिटाला वंदनाने जसप्रीत कौरच्या पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर केले. त्यानंतर भारताचेच सामन्यावर वर्चस्व राहिले. फक्त २५व्या मिनिटाला मलेशियाकडे गोल करण्याची नामी संधी चालून आली होती. परंतु भारतीय गोलरक्षक योगिता बालीने निर्धाराने तो अडवला.
भारताला अपेक्षा  मोठय़ा विजयाची
पहिल्याच सामन्यात फिजी संघाचा १६-० असा धुव्वा उडविणारा भारतीय संघ येथे सुरू असलेल्या जागतिक हॉकी लीगमध्ये बुधवारी आणखी एका मोठय़ा विजयाची अपेक्षा असून मेजर ध्यानचंद स्टेडियमवर ही स्पर्धा सुरू आहे.
सरदारा सिंगच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या भारताने पहिल्या सामन्यात अतिशय वेगवान खेळ केला होता. ओमानविरुद्धही त्यांना तशाच विजयाची अपेक्षा आहे. फिजीविरुद्धच्या सामन्यात भारताच्या दहा खेळाडूंनी आपल्या नावावर गोल करण्याचा मान मिळविला.