पाकिस्तान संघाचा २-० नं दारुण पराभव करत न्यूझीलंडनं आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. ११८ गुणांसह न्यूझीलंड कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानी विराजमान आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात न्यूझीलंड पहिल्यांदाच अव्वल स्थानी पोहचलं आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या नावावर ११६ तर तिसऱ्या क्रमांकावर अससेल्या भारतीय संघाच्या नावावर ११४ गुणांची नोंद आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडनं पाकिस्तान संघाचा डाव आणि १७६ धावांच्या मोठ्या फरकानं पराभव केला आहे.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्ताननं पहिल्या डावांत २९७ धावांपर्यंत मजल मारली होती. या आवाहनाचा पाठलाग करताना केन विल्यमसनच्या द्विशतकी खेळीच्या बळावर न्यूझीलंडनं ६५९ धावांचा डोंगर उभा केला होता. प्रतिउत्तरदाखल पाकिस्तानचा संघ दुसऱ्या डावांत १८६ धावांवर आटोपला.


कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत न्यूझीलंडचा सर्वोच्च धावसंख्या उभारली आहे. विल्यमसनच्या २३८ धावांच्या खेळीच्या बळावर न्यूझीलंडनं पहिल्या डावात ६ बाद ६५९ धावांचा डोंगर उभारला होता. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील ही आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेनं श्रीलंकेच्या विरोधात ६२१ धावां चोपल्या होत्या. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका वगळता फक्त भारतीय संघानं ६०० धावसंख्येचा टप्पा ओलांडला आहे.


मागील १७ सामन्यापासून न्यूझीलंडचा संघ घरच्या मैदानावर अजिंक्य आहे. आज न्यूझीलंडनं लागोपाठ सहावा विजय मिळवला आहे. तर तिसऱ्यांदा क्लीन स्वीप दिला आहे. २०१७ मध्ये घरच्या मैदानावर न्यूझीलंडला पराभवचा धक्का बसला होता. मागील १७ कसोटी सामन्यात यजमान न्यूझीलंडनं १३ सामन्यात विजय मिळवला आहे तर चार सामने अनिर्णीत राहिले आहे.

आणखी वाचा

IND vs AUS : ४३ वर्षांनी योग जुळला; निकालही जुळणार का?

सिडनीत कशी आहे भारताची कामगिरी? जाणून घ्या आकडे

पुढील आव्हानाचा सामना करण्यासाठी नटराजन तयार, कसोटी पदार्पणाबाबत केलं महत्वाचं ट्विट

सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या संघात महत्वाचे दोन बदल; कर्णधार, प्रशिक्षकानं दिले संकेत

जाफर गुरुजींचा कानमंत्र : वॉर्नरला बाद करण्यासाठी पंतला दिला सांकेतिक सल्ला, तुम्हाला कळतोय का पाहा