सौरव गांगुलीने बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सुत्र हाती घेतल्यानंतर आता संघटनेत नवीन बदल व्हायला लागले आहेत. गेल्या काही वर्षांत दिवस-रात्र कसोटी सामने खेळायला नकार दर्शवणाऱ्या बीसीसीआयने आता या प्रकारासाठी पुढाकार घेतला आहे. बांगलादेशच्या आगामी भारत दौऱ्यात, विराट कोहलीचा भारतीय संघ आपला पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळणार आहे. २२ नोव्हेंबरला कोलकात्याच्या ऐतिहासिक इडन गार्डन्स मैदानावर हा सामना रंगेल. मात्र हा सामना कसा रंगेल, यातले नियम काय असतील अशा काही मुलभूत प्रश्नांचा आढावा आपण या व्हिडीओतून घेणार आहोत…