IPL Auction Dhoni Befitting Reply To Fans: इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 2024 च्या हंगामातील गतविजेत्या, धोनीच्या CSK ने मिनी-लिलावात काही उल्लेखनीय खेळाडूंचा समावेश करून त्यांचा अंतिम संघ सुसज्ज केला आहे. चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सच्या गेराल्ड कोएत्झीला आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) च्या अल्झारी जोसेफसाठी बंपर ऑफर केली होती पण अगदी काहीश्या फरकाने हे दोन खेळाडू सीएसकेने गमावले. असं असलं तरी सीएसकेने आयपीएल २०२४ साठी अंबाती रायुडूच्या जागी समीर रिझवीला घेऊन, डॅरिल मिशेल, व किवी अष्टपैलू मिचेल, तसेच न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू रचिन रवींद्रला १.८ कोटी रुपयात संघात समाविष्ट करून चांगले निर्णयही घेतले आहेत असं म्हणता येईल. दरम्यान काही लहान मोठ्या बदलांसह सज्ज सीएसकेच्या संघाचा पाठीचा कणा म्हणजेच धोनीलाच आता लिलावानंतर आरसीबी जॉईन करण्याची विनंती करण्यात आली आहे. यावर धोनीने दिलेलं शंभर नंबरी उत्तरही सर्वत्र व्हायरल होत आहे, नेमकं हे प्रकरण काय हे पाहूया..

धोनीने आरसीबीमध्ये सहभागी व्हावे, कोणी व्यक्त केली इच्छा?

दुबईतील लिलावाच्या नंतर पत्रकार परिषदेत बोलताना, धोनीला त्याच्या एका चाहत्याकडून प्रश्न करण्यात आला होता. सीएसकेच्या कर्णधाराने विराट कोहलीसह आरसीबीमध्ये सामील व्हावे अशी इच्छा या चाहत्याने प्रकट केली होती. तो म्हणाला की, “मी १६ वर्षांपासून आरसीबीचा कट्टर चाहता आहे आणि ज्या प्रकारे तुम्ही सीएसकेसाठी पाच विजेतेपदे जिंकलीत, त्याप्रमाणे तुम्ही आम्हाला पाठिंबा द्यावा आणि आमच्यासाठी एक ट्रॉफी जिंकावी अशी माझी इच्छा आहे.”

Itishree thinking about What do I really want is very important in relationship
इतिश्री : ‘मला नेमकं हवंय काय?’
Florida woman’s pet dog scares off alligator Nail-biting video is viral
“क्या मगरमच्छ बनेगा रे तू!” कुत्र्याला पाहून मगरीने ठोकली धूम, पळत जाऊन तळ्यात मारली उडी! पाहा Viral Video
vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
Puppy beaten, Pimpri,
Video : पिंपरीत श्वानाच्या पिल्लाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल, मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल

धोनीने दिलं खणखणीत उत्तर

चाहत्यांच्या प्रेमाचा व विनम्रतेचा मान ठेवून धोनी उत्तर देत म्हणाला की, “आरसीबीने लीगसाठी एक चांगला संघ तयार केला आहे. आता आपल्याला तुम्हाला क्रिकेटमध्ये जे पाहायचं असतं ते तसंच्या तसं कधीच घडत नाही. आणि आयपीएल बद्दलच बोलायचं झालं तर आयपीएल स्पर्धेत १० संघ आहेत, त्यातले खेळाडू सक्षम आहेत. आणि प्रत्येक संघ तितकाच मजबूत आहे. दुखापतीमुळे काही वेळा अर्थात चढउतार येतात पण त्या व्यतिरिक्त प्रत्येकाला आयपीएलमध्ये चांगली संधी आहे. आता खरंतर, माझ्या टीममध्ये काळजी करण्यासारख्या बर्‍याच गोष्टी माझ्या समोर आहेत. तरीही मी प्रत्येक संघाला शुभेच्छा देऊ इच्छितो, परंतु त्याहूनही अधिक, मी काही करू शकत नाही. तुम्हीच विचार करा की मी इतर संघाला पाठिंबा देण्यासाठी किंवा मदत करण्यासाठी जास्त उत्सुक दिसलो तर आमच्या चाहत्यांना कसे वाटेल?”

हे ही वाचा<< IPL लिलावात ‘या’ खेळाडूचं नाव ऐकताच आरसीबीच्या अधिकाऱ्यांनी जोडले हात; चाहते नाराज, पण कारण काय?

IPL 2024 साठी CSK चा संघ कसा आहे?

आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक कॅप असलेला खेळाडू, धोनी पुढील गतवर्षाचे विजेतेपद राखून ठेवण्यासाठी २५ सदस्यीय संघाचं नेतृत्व करेल. यामध्ये तब्बल आठ परदेशी खेळाडू आहेत. रचिन (1.8 कोटी रुपये), शार्दुल ठाकूर (4 कोटी रुपये), मिशेल (14 कोटी रुपये ), रिझवी (8.4 कोटी रुपये) आणि मुस्तफिझूर रहमान (2 कोटी रुपये) हे सीएसकेचे महागडे खेळाडू आहेत. तर याव्यतिरिक्त मोईन अली, दीपक चहर, डेव्हॉन कॉनवे, तुषार देशपांडे, शिवम दुबे, रुतुराज गायकवाड, राजवर्धन हंगरगेकर, रवींद्र जडेजा, महेश थेक्षाना, मिचेल सँटनर आणि अजिंक्य रहाणे यांना नवीन हंगामापूर्वी कायम ठेवले आहे.