IPL Auction 2024: आयपीएल २०२४ साठी खेळाडूंचा लिलाव दुबईत होत आहे. या लिलावात सर्व १० संघांची एकूण पर्स रक्कम २६२.९५ कोटी रुपये होती. या पर्समधून जास्तीत जास्त ७७ खेळाडू खरेदी करता येणार आहेत. आतापर्यंत मिचेल स्टार्क हा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. तब्बल २४. ७५ कोटी रुपये कमावलेल्या मिचेलच्या पाठोपाठ पॅट कमिन्ससाठी शुद्ध २० कोटींची बोली लावण्यात आली होती. आयपीएलच्या लघुलिलावाच्या वेळी एका पाठोपाठ एक मोठ्या बोली लागत होत्या पण लिलावादरम्यान जोश हेझलवूडच्या नावाची घोषणा करण्यात आली तेव्हा आरसीबी व्यवस्थापनानेने दिलेली प्रतिक्रिया आता चर्चेत आली आहे.
जोश हेझलवुड मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून आयपीएल २०२४ मध्ये खेळण्यासाठी उपलब्ध असणार आहे. वेगवान गोलंदाज त्याच्या पत्नीसह त्याच्या पहिल्या मुलाची अपेक्षा करत असल्याने तो आपल्या कुटुंबासह वेळ घालवण्यावर भर देणार आहे त्यामुळेच लिलावापूर्वी फ्रँचायझीने त्याला रिलीझ केले आहे. आज जेव्हा लिलावाच्या दरम्यान, हेझलवूडच्या नावाची घोषणा झाली तेव्हा आरसीबी त्याच्या शिवाय आनंदी आहे असा इशारा करत टेबलवरील अधिकारी हात जोडताना दिसले, असा दावा व्हायरल पोस्टमध्ये करण्यात आला आहे. याची पुष्टी होऊ शकली नसली तरी अनेकांनी या कृतीवर नाराजी व्यक्त केली आहे.
यावर काही चाहत्यांनी आरसीबीच्या कृतीवर नाराजी व्यक्त केली आहे.
आरसीबीने कायम ठेवलेले खेळाडू: आकाश दीप, अनुज रावत, दिनेश कार्तिक, फाफ डू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल, हिमांशू शर्मा, कर्ण शर्मा, महिपाल लोमरोर, मनोज भंडागे, मयंक डागर (टी), मोहम्मद सिराज, राजन कुमार, रजत पाटीदार, रीस टोपले, सुयश प्रभुदेसाई, विराट कोहली, वैज्ञानिक विजय कुमार, विल जॅक्स
आरसीबीने रिलीझ केलेले खेळाडू: अविनाश सिंग, डेव्हिड विली, फिन ऍलन, हर्षल पटेल, जोश हेझलवूड, केदार जाधव, मायकेल ब्रेसवेल, सिद्धार्थ कौल, सोनू यादव, वानिंदू हसरंगा, वेन पारनेल
हे ही वाचा<< २४.७५ कोटी कमावलेल्या मिचेल स्टार्कच्या पत्नीला WPL मध्ये मिळाली मोठी रक्कम; दोघांची कमाई ऐकून व्हाल थक्क
दरम्यान, आजच्या लिलावात सर्वाधिक विक्रमी कमाई केलेल्या खेळाडूंमध्ये मिचेल स्टार्क 24.75 कोटी (कोलकाता नाईट रायडर्स), पॅट कमिन्स 20.05 कोटी (सनरायझर्स हैदराबाद), डॅरेल मिशेल 14.75 कोटी (चेन्नई सुपर किंग्स), हर्षल पटेल 11.74 कोटी (पंजाब किंग्ज) या नावांचा समावेश आहे.