Aiden Markram’s amazing catch Video Viral : सनरायझर्स इस्टर्न केपने पहिल्या क्वालिफायरमध्ये डर्बन सुपर जायंट्सचा ५१ धावांनी पराभव करून एसए टी-२० च्या दुसऱ्या हंगामातील अंतिम फेरीत प्रवेश केला. कर्णधार एडन मार्करमने २३ चेंडूत ३० धावांचे योगदान दिले. पण या सामन्यात घेतलेल्या एका झेलमुळे तो प्रसिद्धीच्या झोतात आला. या मोसमातील हा सर्वोत्तम झेल असू शकतो. मार्करमने हवेत उड्डाण करताना आश्चर्यकारक झेल घेतला. हा झेल पाहून सर्व प्रेक्षक थक्क झाले. त्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

जेव्हा एडन मार्करमने हा झेल घेतला, तेव्हा डर्बन सुपर जायंट्सची धावसंख्या ३.४ षटकात २ बाद १३ होती. वेगवान गोलंदाज ओटनीएल बार्टमनच्या चेंडूवर जेजे स्मट्सने मिड-ऑनच्या दिशेने पुल शॉट मारला. जो पूर्णपणे कनेक्ट होऊ शकला नाही, पण चेंडू आरामात मिड-ऑनच्या फील्डरवरून गेला असता. मात्र, एडन मार्करमने तसे होऊ दिले नाही.

मार्करमने घेतला आश्चर्यकारक झेल –

सनरायझर्स इस्टर्न केपचा कर्णधार मार्करमने हवेत उंच उडी मारली आणि उजव्या हाताने त्याच्या डोक्यावरील चेंडू पकडला. यानंतर तो जमिनीवर पडला. त्यानंतरही त्याने चेंडू हातातून खाली पडू दिला नाही. हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. मार्करमने झेल पूर्ण करताचा त्याच्या सहकाऱ्यांनी एकच जल्लोष केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा – AUSW vs SAW : आऊट की नॉट आऊट? आंतरराष्ट्रीय सामन्यात महिला अंपायरचा उडाला गोंधळ, VIDEO व्हायरल

सनरायझर्स इस्टर्न केपचा डाव –

सनरायझर्स इस्टर्न केपकडून इंग्लंडच्या डेव्हिड मलानने सर्वाधिक ६३ धावा केल्या. याशिवाय कर्णधार एडन मार्करमने ३० आणि सलामीवीर जॉर्डन हरमनने २१ धावा केल्या. उर्वरित फलंदाज अपयशी ठरले. ट्रिस्टन स्टब्स १४ धावा करून बाद झाला, तर पॅट्रिक क्रुगर ११ धावा करून बाद झाला. चार फलंदाजांना दुहेरी आकडा पार करता आला नाही. डर्बन सुपर जायंट्सकडून केशव महाराज आणि ज्युनियर डाला यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. नवीन उल हक आणि ड्वेन प्रिटोरियसने प्रत्येकी एक विकेट घेतली.

हेही वाचा – ICC : बुमराहने कसोटी क्रमवारीत अश्विनला मागे टाकत रचला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील पहिला गोलंदाज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फायनल कधी आणि कुठे खेळवली जाणार?

दक्षिण आफ्रिका टी-२० लीग २०२४ चा अंतिम सामना १० फेब्रुवारी रोजी खेळवला जाईल. इस्टर्न केप क्वालिफायर-१ जिंकून सनरायझर्सने आधीच अंतिम फेरी गाठली आहे. अशा परिस्थितीत, आता एलिमिनेटर फेरी आणि क्वालिफायर-२ फायनलच्या आधी खेळले जातील, जिथे पार्ल रॉयल्स आणि जोहान्सबर्ग सुपर किंग्स यांच्यात ७ फेब्रुवारीला एलिमिनेटर खेळला जाईल, तर क्वालिफायर २ डर्बन सुपर जायंट्स आणि रॉयल यांच्यात होईल. एलिमिनेटर सामना जिंकणारा संघ. त्यानंतर क्वालिफायर-२ जिंकणारा संघ अंतिम फेरीत सनरायझर्सशी भिडणार आहे.