David Warner entering the Delhi Capitals camp: दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर आयपीएलच्या आगामी हंगामापूर्वी फ्रँचायझीमध्ये सामील झाला आहे. प्रशिक्षण सत्रादरम्यान तो लवकरच संघाच्या शिबिरात उपस्थित असलेल्या इतर खेळाडूंना भेटेल. दिल्ली कॅपिटल्सचा नियमित कर्णधार ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत डेव्हिड वॉर्नरला स्वत:ला सिद्ध करण्याचे आव्हान असेल, असा विश्वास ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसनने व्यक्त केला आहे.

दिल्ली कॅपिटल्सने सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये वॉर्नर फ्रँचायझीच्या हॉटेलमध्ये पोहोचला आहे. व्हिडिओमध्ये ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नर पुष्पा स्टाईलमध्ये ‘मैं झुकेगा नहीं’ स्टेप करताना दिसत आहे. दिल्ली कॅपिटल्सने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये डेव्हिड वॉर्नर म्हणाला, “मी दिल्लीत आलो आहे. प्रशिक्षण तर बनतेच.”

Boucher Pollard Argued With Umpire
MI vs CSK : चेन्नईविरुद्धच्या ‘लाइव्ह मॅच’मध्ये मुंबईच्या बाउचर, पोलार्ड आणि डेव्हिडने पंचांशी घातला वाद, पाहा VIDEO
IPL 2024 PBKS Vs RR Match Updates in Marathi
PBKS vs RR : संजू सॅमसनने धोनीप्रमाणे दाखवली चतुराई, लियाम लिव्हिंगस्टोनच्या ‘रनआऊट’चा VIDEO होतोय व्हायरल
Rohit sharma speech in Mumbai Indians Dressing Room Video MI vs DC
IPL 2024: ‘वैयक्तिक कामगिरी, विक्रम फारसे महत्त्वाचे नाहीत…’, रोहित शर्माने मुंबईच्या विजयानंतर ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंशी साधला संवाद
Today Mumbai Indians vs Delhi Capitals match in Indian Premier League IPL MI VS DC 2024 sport news
Ipl match, DC vs MI: मुंबईला विजयी लय सापडणार? आज घरच्या मैदानावर दिल्ली कॅपिटल्सचे आव्हान; हार्दिक, सूर्यकुमारकडे लक्ष

ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसनने स्टार स्पोर्ट्सच्या एका कार्यक्रमात दिल्ली कॅपिटल्सच्या मजबूत बाजूबद्दल सांगितले. तो म्हणाला, “अनेक प्रतिभावान खेळाडू उपस्थित आहेत. माझ्या मते डेव्हिड वॉर्नर अव्वल आहे. त्याला सिद्ध करावे लागेल आणि सर्वजण त्याच्या मागे असतील. त्याने आयपीएलमध्ये नेहमीच धावा केल्या आहेत आणि सलामीवीर म्हणून डावाची सुरुवात करणे, जे तो करतो, तो खूप महत्त्वाचा असणार आहे.

शेन वॉटसन पुढे म्हणाला,”मला वाटतं मिचेल मार्शसाठी हा आणखी एक मोठा हंगाम असणार आहे. त्याच्याकडे फलंदाजीचे अप्रतिम कौशल्य आहे. आमच्याकडे युवा खेळाडूही आहेत जे बॅट आणि बॉलने चांगली कामगिरी करू शकतात. आमच्याकडे नागरकोटी आणि चेतन साकारिया आहेत. फिरकी विभागात अक्षर पटेल आणि कुलदीप यादव आहेत. त्यांना जागतिक दर्जाचा गोलंदाजीचा अनुभव आहे. मधल्या षटकांमध्ये धावा थांबवण्याबरोबरच ते विकेट्सही घेऊ शकतात.”

हेही वाचा – Imran Nazir: पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा! म्हणाला, ‘मला विष दिले होते आणि माझे सांधे…’

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कार अपघातात झालेल्या दुखापतीमुळे ऋषभ पंत आयपीएल २०२३ हंगामाला मुकणार आहे, ज्यामुळे वॉर्नरची दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वॉर्नरने यापूर्वी दिल्ली डेअरडेव्हिल्स नावाच्या एका दिल्ली-आधारित फ्रँचायझीचे नेतृत्व केले होते आणि २०१६ च्या आवृत्तीत संघाचे नेतृत्व करताना सनरायझर्स हैदराबादसह आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून यश मिळवले होते.