Video of Mohammed Rizwan refusing to shake hands with women : ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा आणि शेवटच्या कसोटी सामना शनिवारी (६ जानेवारी) सिडनीत पार पडला. या सामन्यानंतर एक मनोरंजक दृश्य पाहायला मिळाले. सामना संपल्यानंतर ग्लेन मॅकग्रा कुटुंबातील महिला सिडनी क्रिकेट मैदानावर खेळाडूंना भेटत असताना, मोहम्मद रिझवानच्या कृत्तीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. याठिकाणी ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानच्या सर्व खेळाडूंनी या महिला सदस्यांशी हस्तांदोलन केले. मात्र, मोहम्मद रिझवान दुरूनच त्यांना नमस्कार करून निघून गेला.

मॅकग्रा फाऊंडेशन सिडनी येथे खेळल्या गेलेल्या या कसोटी सामन्याचे आयोजक होते. खरं तर, गेल्या काही वर्षांपासून, सिडनीमध्ये जानेवारीमध्ये खेळल्या जाणार्‍या प्रत्येक कसोटीचे आयोजन मॅकग्रा फाऊंडेशनच्या सहकार्याने केले जाते. स्तनाच्या कर्करोगाबाबत जनजागृती करण्यासाठी या कसोटीचे आयोजन केले जाते. ऑस्ट्रेलियाचा महान गोलंदाज ग्लेन मॅकग्राच्या पत्नीने २००८ मध्ये स्तनाच्या कर्करोगामुळे जगाचा निरोप घेतल्यापासून, क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि मॅकग्रा फाऊंडेशन या आजाराबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी जानेवारी महिन्यात सिडनीमध्ये ‘पिंक टेस्ट’ आयोजित करतात.

मोहम्मद रिझवानचा महिलांशी हस्तांदोलन करण्यास नकार –

महिलांप्रती असलेल्या त्यांच्या समर्पणामुळे येथील दोन्ही संघातील खेळाडू गुलाबी रंगाच्या टोप्या घालतात आणि जर्सीवरील क्रमांकही गुलाबी रंगात लिहिलेले असतात. या सामन्याला ‘पिंक टेस्ट’ असे देखील म्हटले जाते. दरवर्षी सिडनीतील ‘पिंक कसोटी’नंतर मॅकग्रा फाऊंडेशन आणि कुटुंबातील महिला सदस्य खेळाडूंना भेटतात. शनिवारी अशाच एका भेटीदरम्यान रिझवानशी संबंधित एक व्हिडीओ समोर आला आहे.

हेही वाचा – ‘पाऊस थांबला की छत्रीचे ओझे वाटते’, किरॉन पोलार्डच्या इन्स्टा स्टोरीने खळबळ; नेटीझन्स म्हणतात मुंबई इंडियन्स

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की इतर सर्व पाकिस्तानी खेळाडू येथील महिला सदस्यांना भेटू त्यांच्याशी हस्तांदोलन केले, परंतु रिझवान काही अंतरावरच उभा राहतो. मात्र, तो या महिला सदस्यांसमोरून अत्यंत आदराने हात जोडून जाताना दिसतो. यावेळी महिला सदस्यही रिझवानला नमस्ते म्हणताना दिसत आहेत. या क्षणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.