scorecardresearch

Premium

WOR vs DER: नवदीप सैनीचा कौंटी क्रिकेटमध्ये धमाका! हॅरी केमला पहिल्याच चेंडूवर केले क्लीन बोल्ड, पाहा VIDEO

Navdeep Saini video viral: भारताचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनी हा सध्या इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट खेळत आहे. दरम्यान वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी त्याची टीम इंडियात निवड झाली आहे. त्यामुळे तो लवकरच वेस्ट इंडिजसाठी रवाना होणार आहे.

Saini takes first ball wicket in county
नवदीप सैनी (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Navdeep Saini bowled Harry Kem in first ball: कॅरेबियन दौऱ्यासाठी कसोटी संघात निवड झाल्यानंतर नवदीप सैनीने काउंटी क्रिकेटमध्ये चमक दाखवली आहे. दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी सैनीने पहिल्याच चेंडूवर वूस्टरशायरसाठी पहिली विकेट घेतली. काउंटी चॅम्पियनशिप डिव्हिजन दोनमध्ये डर्बीशायरविरुद्ध त्याने ही कामगिरी केली. कॅरेबियन दौऱ्यावर टीम इंडियात सामील होण्यापूर्वी सैनी कौंटीमध्ये एक सामना खेळणार आहे. लंडनला पोहोचल्यानंतर त्याला भारतीय संघात निवड झाल्याची माहिती मिळाली.

नवदीप सैनीने डर्बीशायरचा सलामीवीर हॅरी केमला क्लीन बोल्ड केले. चेंडूची लेंथ ओळखण्यात फलंदाजाने चूक केली. चेंडू पडल्यानंतर आत आला आणि केमने चेंडू सोडण्याची चूक केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर डर्बीशायरच्या संघाने ३२ धावांत २ गडी गमावले. सैनीने ३ षटकात १२ धावा देत १ बळी घेतला. त्याचबरोबर डिलन पेनिंग्टनने एक विकेट घेतली. तत्पूर्वी, पहिल्या डावात वूस्टरशायरचा संघ २३७ धावांत सर्वबाद झाला होता.

Pakistan vs Netherlands Cricket Cricket World Cup 2023
World Cup 2023, PAK vs NED: बाबर आझम वर्ल्ड कपच्या पहिल्याच मॅचमध्ये ठरला फ्लॉप, सोशल मीडियावर युजर्सनी उडवली खिल्ली
World cup 2023 Updates
World Cup 2023: विश्वचषकापूर्वी शुबमन गिलनंतर ‘या’ अष्टपैलू खेळाडूने वाढवली भारताची डोकेदुखी; सराव सत्रात बोटाला झाली दुखापत
Cricket field became a war arena Bangladeshi players beat each other with bats 6 people admitted to hospital
Cricket Fight: क्रिकेट सामन्याचे WWE मध्ये रूपांतर, बॅट अन् स्टंपने तुफान हाणामारी, सहा खेळाडू गंभीर जखमी; पाहा Video
ICC Rankings: No. 1 Team India India's dominance in all three formats of cricket Only two teams in the world managed this feat
ICC Rankings: एकच नंबर! क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा बोलबाला, जगात फक्त दोन संघांना जमला हा पराक्रम

सैनी हा सामना खेळू शकणार नाही –

वूस्टरशायरकडून कर्णधार जेक लिबीने सर्वाधिक ७८ धावा केल्या. डर्बीशायरकडून अनुज दलाने ४५ धावांत ५ बळी घेतले. त्याने वूस्टरशायरची टॉप ऑर्डर उद्ध्वस्त केली. ३० वर्षीय सैनीने वूस्टरशायरशी चार सामन्यांचा करार केला आहे, परंतु भारतीय संघात त्याची निवड झाल्यानंतर त्याला मध्यभागी परतावे लागेल. सैनी डर्बीशायर विरुद्धच्या सामन्यानंतर यॉर्कशायर (१०-१३ जुलै), लीसेस्टरशायर (१९-२२ जुलै) आणि ग्लॉस्टरशायर (२६-२९ जुलै) यांच्याशी सामना करण्यासाठी अनुपलब्ध असेल.

हेही वाचा – Team India: भारतीय संघाचा भावी कर्णधार कोण? यावर भाकीत करताना सुनील गावसकरांनी सांगितली ‘या’ दोन खेळाडूंची नावे

टीम इंडियात निवड झाल्याबद्दल नवदीप सैनी काय म्हणाला?

टीम इंडियात निवड झाल्यानंतर नवदीप सैनीने इंडियन एक्सप्रेसला सांगितले होते की, “वेस्ट इंडिज मालिकेपूर्वी एक सामना खेळणे ही चांगली तयारी असेल. काही षटके गोलंदाजी करायला मिळतील.” भारत कॅरेबियन दौऱ्यातील पहिला कसोटी सामना १२ ते १६ जुलै दरम्यान डोमिनिकामध्ये आणि दुसरा आणि अंतिम सामना २० ते २४ जुलै दरम्यान त्रिनिदादमध्ये खेळणार आहे.

भारतीय एकदिवसीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, चहल. कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Video of navdeep saini bowled harry kem on the first ball in county cricket has gone viral vbm

First published on: 26-06-2023 at 12:34 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×