Michael Neser Catch Jordan Silk: बिग बॅश लीग (BBL) २५ वा सामना, रविवारी सिडनी सिक्सर्स आणि ब्रिस्बेन हीट या संघांमध्ये रंगला. द गब्बा येथे रंगलेल्या या सामन्यात एक अत्यंत हिंमतीची व तितकीच बुचकळ्यात टाकणारी कॅच मायकेल नेसरने झेलली होती. सिडनी सिक्सर्स समोर २२५ असताना जॉर्डन सिल्कची तुफान फटकेबाजी सुरु होती, अशावेळी जॉर्डनला बाद करण्याची एक सुवर्णसंधी ब्रिस्बेनच्या मायकेल नेसरला गवसली, नेसरने सुद्धा या संधीचं सोनं करण्यासाठी अत्यंत जिगरबाज कृती केली. हीच कॅच आता BBL सह जगभरातील क्रिकेट प्रेक्षकांच्या वादाचा मुद्दा ठरत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शेवटच्या षटकात मार्क स्टीकेटीच्या गोलंदाजीवर जॉर्डन सिल्कने चेंडू हवेत भिरकावला. लाँग-ऑफ बाऊंड्रीजवळ क्षेत्ररक्षण करणाऱ्या नेसररने लाईनच्या अगदी थोडक्यात आधी हा चेंडू हवेतच झेलला पण इथे आपला तोल जाणार हे लक्षात आल्याने नेसरने चेंडू पुन्हा हवेत फेकून मग तोल सांभाळून पकडण्याचा प्रयत्न केला पण मुळात जेव्हा नेसरने कॅच पकडली तेव्हा तो आणि चेंडू दोघेही सीमारेषेच्या बाहेर होते. हे पाहून पुन्हा त्याने चेंडू आत फेकला आणि मग सीमारेषेच्या आत जाऊन कॅच पकडली

थर्ड अंपायरनुसार सिल्कला बाद देण्यात आले पण मुळात चेंडू व फिल्डर दोघे बाहेर असताना बाद कसं दिलं हा प्रश्न सर्वांना पडत आहे. थर्ड अंपायरने बाद दिल्यावर २३ चेंडूत ४१ धावा करून सिल्क माघारी परतला. त्याने २ षटकार आणि ३ चौकारांसह ४१ धावा केल्या होत्या. जॉर्डन सिल्क हा खरंच बाद होता की हा सिक्स होता हे तुम्ही स्वतः हा व्हिडीओ पाहून सांगा..

Out की Six?

दरम्यान, क्रिकेटच्या MCC कायद्यांतर्गत नियम १९. ४. २ नुसार क्षेत्ररक्षक सीमारेषेपलीकडे जमिनीवर असलेल्या चेंडूला स्पर्श करतो, किंवा क्षेत्ररक्षक, चेंडू सीमारेषेत पकडल्यानंतर, झेल पूर्ण करण्यापूर्वी चेंडूच्या संपर्कात असताना सीमारेषेपलीकडे मैदानाला टच करतो. अशावेळी तो सिक्स धरला जातो.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video out or six michael neser unbelievable catch of jordan silk bbl 12 ball out of the boundary thrown thrice in air viral svs
First published on: 02-01-2023 at 10:12 IST