Prithvi Shaw News viral Video: भारताचा स्टार क्रिकेटर पृथ्वी शॉ वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याच्यावर मुंबईत हल्ला झाला आहे. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेल्फी घेण्यास नकार दिल्याने काही चाहत्यांनी संतप्त होऊन त्यांच्या मित्राच्या कारवर हल्ला केला. ही घटना बुधवारी संध्याकाळची असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी आठ जणांविरुद्ध एफआयआर नोंदवून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

वास्तविक, पृथ्वी शॉच्या बाजूने असे सांगण्यात आले आहे की भारतीय स्टार सांताक्रूझमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवायला गेला होता. यानंतर एक व्यक्ती त्याच्याजवळ आला आणि सेल्फी काढण्याची मागणी करू लागला. पृथ्वीने चाहत्यांना निराश न करता सेल्फी काढण्यास परवानगी दिली. काही वेळाने तो व्यक्ती आपल्या काही मित्रांसह तेथे पोहोचला आणि पुन्हा सेल्फीची मागणी करू लागला. पृथ्वी शॉने त्यांना असे सांगून नकार दिला की तो मित्रांसोबत जेवायला आला आहे आणि मला कोणताही त्रास देऊ नका.

IPL 2024 CSK Themed Wedding Invitation Card Went Viral
IPL 2024: चेन्नईच्या चाहत्यांचा नाद खुळा! CSK ची थीम अन् आयपीएलच्या तिकीटासारखी लग्नपत्रिका होतेय व्हायरल
is it good to work 12 hours during pregnancy
गर्भावस्थेत बारा तास काम करणे कितपत योग्य आहे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात, गर्भावस्थेत किती काम करावे?
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक
puppy rescue
माणुसकीला सलाम! दोन भिंतीच्यामध्ये अडकलं कुत्र्याचं पिल्लू; भिंत फोडून काढले बाहेर, पाहा Viral Video

तक्रारीनुसार, जेव्हा चाहते त्याला सेल्फीसाठी आग्रह करू लागले तेव्हा पृथ्वीच्या मित्राने हॉटेल मॅनेजरला फोन करून तक्रार केली. व्यवस्थापकाने त्या लोकांना हॉटेल सोडण्यास सांगितले. पृथ्वी शॉ आणि त्याचे मित्र रात्रीचे जेवण करून हॉटेलमधून कारमध्ये घरी जाण्यासाठी बाहेर पडले तेव्हा काही लोक बेसबॉलच्या काठ्या घेऊन उभे होते. त्यांनी पृथ्वीच्या गाडीची विंडशील्ड तोडली. त्यावेळी कारमध्ये पृथ्वीही उपस्थित होता.

पृथ्वी कारमध्ये असल्याने आम्हाला कोणताही वाद नको असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर पृथ्वीला दुसऱ्या कारमध्ये पाठवण्यात आले. यानंतर पृथ्वी शॉ ज्या दुसऱ्या कारने जात होता ती सुद्धा त्या लोकांनी थांबवली. तेथे एक महिला आली आणि हे प्रकरण सोडवायचे असेल तर ५० हजार रुपये द्यावे लागतील अन्यथा खोटे आरोप करू, असे सांगितले. चाहत्यांनी क्रिकेटपटूच्या गाडीची विंडशील्डही तोडल्याचे बोलले जात आहे. या घटनेनंतर पृथ्वीच्या मित्राने ओशिवरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

हेही वाचा: PSL 2023: ‘ना रिझवान ना बाबर आझम’, चाहत्याने पीएसएल सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये झळकावले ‘हिटमॅन’ चे पोस्टर

या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी आठ जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. यातील दोघांची नावे माहिती झाली असून सहा अज्ञात व्यक्तींचा शोध सुरु आहे. तक्रारीत शोभित ठाकूर आणि सना उर्फ ​​सपना गिल अशी दोघांची नावे आहेत. दोघांनीही आरोप फेटाळून लावले आणि पृथ्वी शॉवर मारहाण केल्याचा आरोप केला. या प्रकरणी सपना गिलचे वकील अली काशिफ खान म्हणतात की, “ही बाचाबाची सपनाने नाही तर पृथ्वी शॉने केली होती.”

हेही वाचा: IND vs AUS 2nd Test : दुसऱ्या कसोटीपूर्वीच ऑस्ट्रेलियन माध्यमांचा टीम इंडियावर गंभीर आरोप, म्हणाले “भारत…”

दरम्यान, या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये सपना आणि तिच्यासोबत उपस्थित असलेले लोक पृथ्वी आणि त्याच्या मित्रांवर मारहाणीचा आरोप करत आहेत. यासोबतच पृथ्वीसोबत बाचाबाची करताना देखील व्हिडिओमध्ये दिसत असल्याचे तो सांगत आहे. या भांडणाच्या व्हिडिओमध्ये पृथ्वी महिला चाहत्याचा सामना करत असून दोघांनी बेसबॉलची बॅट धरल्याचेही दिसून येते. वकिलाचे म्हणणे आहे की, “त्यांची आरोपी सपना हिला ओशिवरा पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. तिला मेडिकल तपासणीला देखील जाऊ दिले जात नाही.”