इंग्लंडविरूद्ध पहिल्या सामन्यात लाजिरवाणारा पराभव झाल्यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीवर पहिल्या दिवसापासूनच वर्चस्व राखले. पहिल्या डावात भारताने ३२९ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडला १३४ धावांत गुंडाळून १९५ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर भारताने दुसऱ्या डावात २८६ धावा करत इंग्लंडला विजयासाठी ४८२ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करता इंग्लंडच्या डावात डॅन लॉरेन्सला ऋषभ पंतने स्टंपिंग केल्याची जोरदार चर्चा रंगली.

Ind vs Eng Video: विराट – पंच यांच्यात बाचाबाची; पाहा नक्की काय घडलं…

चौथ्या डावात इंग्लंडची सुरूवात खराब झाली. सलामीवीर डॉम सिबली (३), रॉरी बर्न्स (२५) आणि जॅक लीच (०) स्वस्तात बाद झाले. त्यानंतर डॅन लॉरेन्स आणि जो रूट यांनी भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला, पण अश्विनच्या गोलंदाजीवर फटका मारण्याचा मोह लॉरेन्सला आवरला नाही. त्याने पुढे येऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू लॉरेन्सच्या पायांमधून वळला आणि पंतच्या दिशेने गेला. पंतसाठी चेंडू पकडणं कठीण होतं, तरीही त्याने अप्रतिम यष्टीरक्षण करत लॉरेन्सला माघारी धाडलं.

पाहा व्हिडीओ-

Ind vs Eng Video: रोहित – पंत यांच्यात मैदानावर राडा? पाहा नक्की काय झालं…

अश्विनची ५५ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी

दुसऱ्या कसोटीत रविचंद्रन अश्विनने इंग्लंडच्या पहिल्या डावात अप्रतिम गोलंदाजी करत ५ बळी घेतले. त्याच्या गोलंदाजीची चर्चा सुरू असतानाच भारताच्या दुसऱ्या डावात त्याने बॅटनेदेखील कमाल केली. दमदार खेळी करत त्याने आपलं पाचवं कसोटी शतक ठोकलं. १९६६ नंतर तब्बल ५५ वर्षांनी इंग्लंडविरूद्ध एखाद्या खेळाडूने एकाच कसोटीत ५ बळी टिपले आणि शतक झळकावण्याचा विक्रम केला.