scorecardresearch

Suryakumar Yadav: “जरा सा चूम लू मे…” मैदानात सुर्यासोबत चहलने केले असे कृत्य पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही, Video व्हायरल

Yuzvendra Chahal kisses Suryakumar’s hands: युजवेंद्र चहलने सूर्यकुमार यादवसाठी असे काहीतरी केले आहे, जे चाहत्यांची मने जिंकत आहे. सूर्यकुमार यादवने श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम टी२० सामन्यात ५१ चेंडूत ११२ धावांची नाबाद खेळी केली.

Suryakumar Yadav: “जरा सा चूम लू मे…” मैदानात सुर्यासोबत चहलने केले असे कृत्य पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही, Video व्हायरल
सौजन्य- (ट्विटर)

श्रीलंकेविरुद्धच्या टी२० मालिकेत भारताने २-१ असा विजय मिळवला. पाहुण्या श्रीलंकन संघाने शेवटच्या टी२० सामन्यात ९१ धावांनी पराभव स्वीकारला आणि मालिका देखील गमावली. सूर्यकुमार यादव याने या सामन्यात वादळी शतक ठोकले आणि संघाच्या विजयात सर्वात महत्वाची भूमिका पार पाडली. सूर्याने अवघ्या ४५ चेंडू शतक पूर्ण केले असून नाबाद ११२ धावां कुटल्या. सामना संपल्यानंतर सूर्यकुमारने खास प्रतिक्रिया दिली.

सूर्यकुमार यादवने राजकोट येथे तिसऱ्या आणि शेवटच्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताला श्रीलंकेविरुद्ध मालिका जिंकण्यास मदत केली. त्याने अवघ्या ४५ चेंडूत शानदार शतक झळकावले. सर्वात लहान फॉरमॅटमधील हे दुसरे वेगवान शतक ठरले. भारतीय खेळाडूंमध्ये रोहित शर्माचे नाव सर्वात वेगवान शतकातील आहे, ज्याने २०१७ मध्ये त्याच संघाविरुद्ध केवळ ३५ चेंडूत केले होते. सूर्यकुमार यादवने जुलै २०२२ मध्ये ट्रेंट ब्रिज येथे इंग्लंडविरुद्ध पहिले शतक झळकावले, त्यानंतर नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध शतक झळकावले. सूर्यकुमार यादवच्या या धमाकेदार खेळीचे सर्व सहकाऱ्यांनी कौतुक केले, मात्र युजवेंद्र चहलने असे काही केले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

युजवेंद्रच्या या हृदयस्पर्शी हावभावाचा व्हिडीओ व्हायरल

वास्तविक, सामन्यानंतरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सूर्यकुमार यादव हर्षा भोगलेला फॉलो करत आहे. हर्षाशी बोलल्यानंतर युजवेंद्र चहल सूर्यकुमार यादवकडे येतो आणि त्याच्या हातांचे चुंबन घेतो. युजवेंद्रच्या या हृदयस्पर्शी हावभावाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो चाहत्यांनाही खूप आवडला आहे. सूर्यकुमार यादवने केवळ त्याच्या चाहत्यांचीच नव्हे तर सहकाऱ्यांचीही मनं कशी जिंकली हे या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलं आहे.

सामन्यानंतर सूर्यकुमारबद्दल बोलताना युजवेंद्र चहल म्हणाला, “सामन्यानंतर मी प्रशिक्षकाशी बोललो आणि सूर्यकुमारने कोणती वेगवान आणि लाईन गोलंदाजी करावी हे विचारले. तो वेगळ्या पातळीवर फलंदाजी करत आहे. मी फक्त त्याच्या टीममध्ये आहे याचा मला आनंद आहे. मालिकेतील शेवटच्या सामन्यात युजवेंद्र चहलने तीन षटकात ३० धावा देत दोन बळी घेतले होते.”

हेही वाचा: Virat Kohli Instagram: “प्रसिद्धीची इच्छा हा आजार…एक दिवस…”, किंग कोहलीची श्रीलंका वनडे मालिकेपूर्वी फिलॉसॉफिकल पोस्ट व्हायरल

सूर्यकुमार यादवच्या या शानदार कामगिरीने प्रशिक्षक राहुल द्रविडही खूप खूश आहेत. जेव्हा हर्षा भोगलेने सूर्यकुमार यादवला राहुल द्रविडच्या त्याच्याविषयी असलेल्याखेळीबद्दलच्या प्रतिक्रियाबाबत विचारले तेव्हा तो (सूर्यकुमार) म्हणाला, “काही शॉट्स आहेत जे आधीच ठरलेले असतात परंतु तुम्हाला इतर शॉट्स देखील परिस्थिती आणि क्षेत्ररक्षण कसे लावले आहे ते बघून मारावे लागतील जेणेकरुन जर गोलंदाजाने त्याचा प्लॅन बदलला तर तुम्हाला हवा असलेला रिझल्ट मिळू शकेल. पुढे तो म्हणतो की, “प्रशिक्षक राहुल द्रविड मला फक्त आनंद घेण्यास सांगतो. तो मला मुक्तपणे कुठलाही दबाव न घेता फलंदाजी करण्यास आणि स्वतःला अधिक व्यक्त होण्यास सांगतो.”

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-01-2023 at 13:35 IST

संबंधित बातम्या