आयसीसीच्या वन-डे क्रिकेट क्रमवारीत भारतीय खेळाडूंनी आपलं वर्चस्व गाजवायला सुरुवात केली आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली आयसीसीच्या वन-डे जागतिक क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहचला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हीलियर्सला मागे टाकत विराट कोहलीने पहिलं स्थान पटकावलं आहे. न्यूझीलंडविरुद्ध अखेरच्या वन-डे सामन्यात विराट कोहलीने केलेल्या शतकी खेळीचा त्याला क्रमवारीत पहिलं स्थान मिळवून देण्यात उपयोग झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याआधी भारताकडून सचिन तेंडुलकरने फलंदाजांच्या क्रमवारीत पहिलं स्थान पटकावलं होतं. सध्या विराटच्या खात्यात ८८९ गुण असून एबी डिव्हीलियर्सच्या खात्यात सध्या ८७२ गुण जमा आहेत. १९९८ सालात सचिन तेंडुलकर ८८७ गुणांसह आयसीसीच्या वन-डे क्रमवारीत पहिल्या स्थानावर राहिला होता. यानंतर विराट कोहलीने केलेली ही कामगिरी सर्वोत्तम मानली जात आहे.

तर दुसरीकडे भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राजही महिलांच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहचली आहे. ७५३ गुणांसह मिताली राजने क्रमवारीत पहिलं स्थान पटकावलं आहे. ऑस्ट्रेलियाची एलिस पेरी ७२५ गुणांसह दुसऱ्या तर न्यूझीलंडची अॅमी सॅटरवेट ७२० गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. महिला विश्वचषकात केलेल्या खेळीचा मिताली राजला फायदा झाल्याचं दिसतंय.

आयसीसीच्या वन-डे क्रमवारीतील भारतीय पुरुष खेळाडू –

१) विराट कोहली – ८८९ गुण
७) रोहित शर्मा – ७९९ गुण

आयसीसीच्या वन-डे क्रमवारीतील भारतीय महिला खेळाडू –

१) मिताली राज – ७५३ गुण
६) हरमनप्रीत कौर – ६७७ गुण

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli and mitali raj bags first position in icc odi rankings in their fields respectively
First published on: 30-10-2017 at 16:25 IST