भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि महिला संघाची महत्वाची खेळाडू स्मृती मंधाना यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. ‘विस्डन’कडून विराट आणि स्मृतीचा सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून गौरव करण्यात आला आहे. याव्यतिरीक्त अफगाणिस्तानचा उदयोनमुख खेळाडू राशिद खानला, सलग दुसऱ्यांदा टी-२० क्रिकेटमधली सर्वोत्तम खेळाडूचा किताब देण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘विस्डन क्रिकेटर ऑफ दी इयर’ पुरस्कारासाठी निवडलेल्या पाच खेळाडूंमध्येही कोहलीने स्थान पटकावले आहे. त्याच्यासह पाच खेळाडूंत टॅमी बेमाँट, जोस बटलर, सॅम कुरन आणि रॉरी बर्न्स यांचा समावेश आहे. १८८९ पासून विस्डन क्रिकेट पुरस्कार दिला जातो. कोहलीला सलग तिसऱ्यांदा हा पुरस्कार मिळणार आहे. त्याने तीनही प्रकारात एकूण २७३५ गुणांची कमाई केली आहे. इंग्लंडमध्येही कोहलीचा बॅट चांगलीच तळपली होती. तेथे पाच कसोटी सामन्यांत त्याने ५९.३ च्या सरासरीने ५९३ धावा केल्या होत्या.

महिला क्रिकेटपटूंत मानधनाची कामगिरी उल्लेखनीय झाली आहे. तिने २०१८ मध्ये वन डे व टी-२० क्रिकेटमध्ये अनुक्रमे ६६९ व ६६२ धावा केल्या आहेत. इंग्लंडमध्ये होणाऱ्या महिला सुपर लीग टी-२० स्पर्धेत मंधानाने १७४.६८ च्या स्ट्राईक रेटने ४२१ धावा केल्या आहेत आणि त्यात एका शतकाचाही समावेश आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli and smriti mandhana names wisden cricketer of the year
First published on: 10-04-2019 at 15:51 IST