सध्या टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली अनुष्कासोबत हनिमून एन्जॉय करत असला तरी गेल्या काही दिवसांमध्ये घडून गेलेल्या गोष्टींवर त्याचे लक्ष आहे. विराट आणि अनुष्काने ११ डिसेंबरला इटलीमध्ये लग्न केले होते. त्यानंतर या दोघांना अनेक क्रिकेटपटून आणि टीम इंडियातील सहकाऱ्यांनी लग्नाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावेळी रोहित शर्मा याने केलेले एक मजेशीर ट्विट चांगलेच गाजले होते. रोहितने नवदाम्पत्याला लग्नाच्या शुभेच्छा देताना भावी आयुष्यासाठी काही टिप्स दिल्या आहेत. ‘विराट मी तुला हजबंड हँडबुक देईन. अनुष्का तुझे आडनाव बदलू नकोस, असे रोहितने या ट्विटमध्ये म्हटले होते.
Congratulations you two! @imVkohli , I’ll share the husband handbook with you. @AnushkaSharma , keep the surname ?
— Rohit Sharma (@ImRo45) December 12, 2017
Haha thanks Rohit, and please do share the Double Hundred Handbook as well. ?
— Virat Kohli (@imVkohli) December 19, 2017
रोहित शर्माच्या या ट्विटला आता विराटनेही गंमतीशीर उत्तर दिले आहे. त्याने म्हटले की, रोहित मला तुझ्या हडबंड हँडबुक सोबत तुझे ‘डबल हंड्रेड’ हँडबुकही दे. रोहित शर्माने काही दिवसांपूर्वी श्रीलंकेविरुद्ध झालेल्या एकदिवसीय सामन्यात कारकीर्दीतील तिसरे द्विशतक झळकावले होते. आपल्या या कामगिरीमुळे रोहितने क्रिकेटविश्वात नवा विक्रम प्रस्थापित केला होता. त्यामुळेच विराटने आपल्या ट्विटमध्ये रोहितला ‘डबल हंड्रेड’ हँडबुक द्यायला सांगितले आहे.
रोहितच्या ‘त्या’ सल्ल्याबद्दल अनुष्काने मानले आभार
नुकत्याच झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत रोहित शर्माने भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. विराटने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून विश्रांती घेतली असल्याने रोहितवर कर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. या संधीचा पुरेपूर लाभ उठवत रोहितने आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवला होता. भारताने ही मालिका २-१ अशा फरकाने जिंकली होती.