आयपीएलच्या साखळी टप्प्यातील महत्त्वाचा सामना आरसीबी वि सीएसके या संघांमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी विराटची एक मुलाखत आऱसीबीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या मुलाखतीत विराट कोहलीला त्याची मुलगी वामिका आणि मुलगा अकायबद्दल विचारण्यात आले. यादरम्यान त्याने लेकीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. पाहा नेमका काय म्हणाला.
विराट कोहलीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने शेअर केलेल्या व्हीडिओमध्ये त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि संघाच्या अलीकडील कामगिरीबद्दल खुलेपणाने चर्चा केली. डॅनिश सैत म्हणजेच आऱसीबीच्या मिस्टर नॅग्सशी बोलताना कोहलीने त्याची मुलगी वामिका आणि अकाय बद्दल वक्तव्य केले.
आरसीबीच्या मिस्टर नॅग्स (दानिश सैत) ला दिलेल्या एका मजेदार मुलाखतीत विराटला त्याने विचारले ‘पपू कसा आहे?’, असे विचारले असता विराटने विचारले की ‘पपू कोण आहे?’ यावर नॅग्स म्हणाला की पपू म्हणजे बाळ. यावर विराट म्हणाला, ‘बाळ एकदम ठीक आहे, निरोगी आहे. सर्व काही उत्तम आहे, धन्यवाद! यावर मिस्टर नॅग्स गमतीने म्हटलं, एक बाळ आयपीएलसाठी आणि एक बाळ डब्ल्यूपीएलसाठी… यावर विराट हसला आणि म्हणाला, अरे हा काय बोलतो…
हेही वाचा – IPL 2024: १८ धावा किंवा १८.१ षटके… आरसीबी की चेन्नई कोण गाठणार प्लेऑफ, वाचा कसं आहे समीकरण?
विराटची लेक क्रिकेटर होणार?
विराट पुढे त्याची मुलगी वामिकाबद्दल म्हणाला, ‘वामिकाने बॅट उचलली आणि तिला हवेत बॅट स्विंग करताना खूप मजा येत होती. पण हो… मी काही सांगू शकत नाही… शेवटी पुढे जाऊन काय करायचे तो त्यांचा निर्णय असेल. विराटच्या या वक्तव्यावरून आता वामिकाही क्रिकेटर होणार की काय अशी चर्चा चाहत्यांमध्ये रंगली आहे. विराटने अजूनही लेकीचा चेहरा ऑफिशियली जगसमोर आणलेला नाही. अनुष्का आणि विराट लेकीसोबत फोटो शेअर करतात पण चेहरा मात्र दाखवताना दिसत नाहीत.
आयपीएलमधील आरसीबीच्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करत कोहलीने संघाच्या अलीकडच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले. संघाच्या पुनरागमनाबद्दल बोलताना कोहली म्हणाला – मे महिना खूप चांगला गेला. एप्रिलमध्ये मला वाटले की आम्ही खूप मागे पडत आहोत. आम्ही चाहत्यांना पुन्हा आनंदित केल्याचा आम्हाला आनंद आहे.
RCB ने आय़पीएल २०२४च्या हंगामाची चेन्नईविरुद्धच्या पराभवाने सुरुवात केली. यानंतर संघाने एक सामना जिंकला, मात्र सलग सहा सामने गमावल्यानंतर आरसीबी प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेरच झाला होता, मात्र त्यानंतर आरसीबीने सलग पाच सामने जिंकले आणि पुन्हा एकदा प्लेऑफच्या शर्यतीत मुसंडी मारली