रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने आयपीएल २०२१मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध हॅट्ट्रिक घेतली. ही हॅट्ट्रिक साजरी करताना कर्णधार विराट कोहलीला दुखापत झाल्याचा खुलासा पटेलने केला आहे. या सामन्यात बंगळुरुने मुंबई इंडियन्सचा ५४ धावांनी पराभव केला. हर्षल पटेलने हार्दिक पंड्या, कायरन पोलार्ड आणि राहुल चहरला बाद करत आपली हॅट्ट्रिक पूर्ण केली. आरसीबीच्या १६६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईचा संघ १११ धावांवर ऑल आऊट झाला.

हॅट्ट्रिक पूर्ण केल्यानंतर हर्षल पटेलने जोरात धाव घेत सेलिब्रेशन केले. कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज हर्षलच्या जवळ धावत होते, ज्यांना काही जखमा झाल्या. यादरम्यान त्याने सिराजच्या पायावर पायही दिला. हर्षल म्हणाला, ”हॅट्ट्रिकनंतर काही खेळाडूंना नुकसान सहन करावे लागले. सिराजचा पाय ठीक आहे. सेलिब्रेशन मी त्याला त्याच्या पायाबद्दल विचारले. चांगली गोष्ट आहे, की तो ठीक आहे. हॅट्ट्रिक सेलिब्रेशन दरम्यान, विराटच्या मांडीला एक ओरखडा आला.”

हेही वाचा – IPL 2021 : मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू अर्जुन तेंडुलकर स्पर्धेबाहेर!

आपल्या यशाबद्दल हर्षल म्हणाला, ”परिस्थितीशी जुळवून घेणे हा नेहमीच माझ्या खेळाचा भाग राहिला आहे. मी स्वत: ला वेगवेगळ्या परिस्थितींशी चांगले जुळवून घेतले आहे. ही मला अभिमानाची गोष्ट आहे. माझी मानसिकता बदलली नाही. मी माझे मत बदलले नाही. परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी स्वतःला मानसिकरित्या तयार केले. मला कोणत्या प्रकारची गोलंदाजी करायची आहे, हे मला ठाऊक आहे.”

हर्षल पटेलकडे सध्या पर्पल कॅप आहे. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात हर्षलने ३ बळी घेत आपल्या एकूण बळींची संख्या वाढवली आहे.