सेंच्युरियन : भारताचा तारांकित फलंदाज विराट कोहली दक्षिण आफ्रिकेत परतला असून रविवारी त्याने कसोटी संघातील अन्य खेळाडूंसोबत सराव सत्रात सहभाग नोंदवला. या वेळी कोहलीसह कर्णधार रोहित शर्मा, शुभमन गिल, केएल राहुल या फलंदाजांसह वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा कसून सराव करताना दिसले.

कोहलीला दक्षिण आफ्रिकेतील ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली होती. त्यानंतर तो कसोटी संघातील अन्य सदस्यांसह दक्षिण आफ्रिकेत दाखल झाला होता; परंतु कौटुंबिक कारणास्तव त्याला संघापासून दूर जावे लागले होते. मात्र, कुटुंबासोबत थोडा वेळ घालवल्यानंतर तो पुन्हा दक्षिण आफ्रिकेत परतला आणि त्याने रविवारी सरावही केला. कोहलीसह रोहित, गिल यांनी तासाभराहूनही अधिक काळ नेट्समध्ये फलंदाजी केली.

Rohit first Indian to hit 500 sixes
MI vs CSK : रोहित शर्माने रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याच भारतीय खेळाडूला जमलं नाही ते करून दाखवलं
d Gukesh defeated Nijat Abasov in the Candidates chess tournament sport news
गुकेश संयुक्त आघाडीवर! पाचव्या फेरीत अबासोववर मात; अन्य भारतीयांच्या लढती बरोबरीत
Mohammad Amir and Imad Wasim Returns to Pakistan National Team
फिक्सिंग, बंदी आणि निवृत्तीनंतर मोहम्मद आमिर पुन्हा पाकिस्तानच्या टी-२० संघात
Abhishek Sharma Breaks Chris Gayle and Sunil Narine's Record in SRH vs CSK Match
SRH vs CSK : अभिषेकने वादळी खेळीच्या जोरावर मोडला गेल-नरेनचा विक्रम, IPL मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज

हेही वाचा >>> आंतरराष्ट्रीय क्रिकेटला प्राधान्य देणे ठरले फायदेशीर; स्टार्कचे वक्तव्य; काही ‘आयपीएल’ हंगामांना मुकल्याचे शल्य नाही!

भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत प्रथमच कसोटी मालिका जिंकण्यासाठी प्रयत्नशील आहे. दोन सामन्यांच्या या मालिकेला २६ डिसेंबरपासून (मंगळवार) प्रारंभ होणार आहे. या मालिकेत केएल राहुल यष्टिरक्षणाची धुरा सांभाळण्याची दाट शक्यता आहे. रविवारी राहुलने फलंदाजीचा सराव केला, त्या वेळी प्रशिक्षक राहुल द्रविड त्याच्यावर लक्ष ठेवून होता. तसेच फलंदाजीनंतर राहुलने यष्टिरक्षणही केले आणि त्याच वेळी यशस्वी जैस्वाल व गिल हे स्लीपमध्ये उभे होते. त्यामुळे पहिल्या कसोटीत रोहितसह यशस्वी सलामीला येणार आणि गिल तिसऱ्या क्रमांकावर खेळणार असे संकेत मिळाले.

अश्विन पुन्हा संघाबाहेर

आशियाबाहेर खेळताना भारतीय कसोटी संघ बहुतांश वेळा चार वेगवान गोलंदाज आणि रवींद्र जडेजाच्या रूपात एकमेव फिरकीपटूसह खेळतो. सुपरस्पोर्ट पार्क स्टेडियमची खेळपट्टीही वेगवान गोलंदाजीला अनुकूल मानली जाते. त्यामुळे या वेळीही भारतीय संघ जडेजाच्या रूपात एकाच फिरकीपटूला संघात स्थान देण्याची शक्यता असून अनुभवी ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विनला संघाबाहेर बसावे लागेल. वेगवान गोलंदाजांमध्ये बुमरा, मोहम्मद सिराज आणि शार्दूल ठाकूर यांचे संघातील स्थान निश्चित मानले जात आहे. चौथ्या वेगवान गोलंदाजाच्या स्थानासाठी मुकेश कुमार आणि प्रसिध कृष्णा यांच्यात स्पर्धा आहे.