scorecardresearch

Premium

“…म्हणून विराट कोहलीने कर्णधारपद सोडलं”; ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूनं सांगितलं कारण

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉगनं कर्णधारपद सोडण्याचं वेगळंच कारण सांगतिलं आहे. क्रिकेटपटू ब्रॅड हॉगनं याबाबतचं म्हणणं मांडलं आहे.

Virat-Kohali-Hogg
"…म्हणून विराट कोहलीने कर्णधारपद सोडलं"; ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूनं सांगितलं कारण

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने एका आठवड्यात दोन मोठ्या घोषणा क्रिकेट जगतात खळबळ उडवून दिली आहे. विराट कोहलीने टी २० विश्वचषकानंतर टी २० संघाचं कर्णधारपद सोडणार असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. हा निर्णय जाहीर करतो न करतो तोच त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं (आरसीबी) कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. आरसीबी संघाचं कर्णधारपदाचं त्याची शेवटची स्पर्धा आहे. आपल्या डोक्यावर कर्णधारपदाचं ओझं कमी करण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. मात्र ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉगनं कर्णधारपद सोडण्याचं वेगळंच कारण सांगतिलं आहे. क्रिकेटपटू ब्रॅड हॉगनं आपल्या यूट्यूब चॅनेलवर याबाबतचं म्हणणं मांडलं आहे.

“विराट कोहलीने टी २० आणि आरसीबीचं कर्णधारपद सचिन तेंडुलकरच्या ५१ कसोटी शतकांची बरोबरी करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी सोडली आहे. क्रिकेट विश्वात भविष्यात महान खेळाडूंच्या यादीत स्थान मिळावं यासाठी यावर लक्ष केंद्रीत करणं गरजेचं आहे. कोहलीने कर्णधारपद दबावात सोडलं आहे, अशी चर्चा निरर्थक ठरेल. यामागे नक्कीच मोठं लक्ष्य असावं”, असं ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉगने सांगितलं.

“विराट एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये भारताचं नेतृत्व करणार आहे. पण त्याचं लक्ष्य सचिन तेंडुलकरच्या १०० आंतरराष्ट्रीय शतकांची बरोबरी करण्याचं आहे”, असं मत ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉगने वर्तवलं आहे.

“एकदिवसीय सामन्यात सचिनने ४९ शतकं तर कसोटीत ५१ शतकं झळकावली आहेत. विराटने एकदिवसीय सामन्यात ४३ शतकं झळकावली आहे. मात्र कसोटीत त्याच्या नावावर केवळ २७ शतकं आहेत. तेंडुलकरने २०० सामन्यात ५१ शतकं झळकावली आहेत. माझ्या मते कोहली कसोटीवर लक्ष केंद्रीत करू इच्छित आहे. सचिनच्या शतकांची बरोबरी करण्याचा त्याचा उद्देश दिसत आहे. त्या दिशेने तो

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Virat kohli quits captaincy former australian cricketer hogg says reason rmt

First published on: 20-09-2021 at 21:26 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×