भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचा मैदानातला आक्रमक स्वभाव आपण अनेकदा पाहिला आहे. मात्र मैदानाबाहेर, समारंभ-पार्टी यासारख्या प्रसंगामध्ये विराट एखाद्या सामन्य माणसाप्रमाणे वागतो. युवराज सिंहच्या लग्नातील पार्टीमध्ये, आयपीएलमध्ये विराट कोहलीचा डान्स सर्वांनी पाहिला आहे. विश्वचषकातील भारतीय संघाच्या पराभवानंतर विराट कोहली एका नवीन रुपात समोर आला आहे. एका खासगी ब्रँडच्या प्रमोशनदरम्यान विराटने आपला डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे.
विराट कोहलीच्या या डान्सवर, त्याचा आयपीएलमधला सहकारी एबी डिव्हीलियर्सनेही प्रतिक्रीया दिली आहे.

दरम्यान विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना होणार आहे. ३ ऑगस्टपासून भारतीय संघाच्या या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. ३ टी-२०, ५ वन-डे आणि २ कसोटी सामने भारतीय संघ या मालिकेत खेळणार आहे.
